मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी १८८६ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मुख्य आरोपी शितल तेजवाणीविरोधात विविध आरोप ठेवण्यात आलेले आहेत. आरोपपत्र जरी दाखल करण्यात आलेले असले तरी पुणे पोलीस यासंदर्भाने पुढील चौकशी सुरू ठेवणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
मुख्य आरोपी शीतल तेजवानी विरोधात ६० दिवसांत चार्जशीट दाखल करणे बंधनकारक होते. तसेच शितल तेजवानीला तुरुंगात ठेवण्यासाठी आरोपपत्र दाखल करणे आवश्यक होते. एफआयआरमधील आरोप कायम ठेवून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.
advertisement
पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील
याप्रकरणी पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांचे नाव वगळण्यात आले आहे. याचे कारण विचारल्यावर आम्हाला आत्तापर्यंत तपासात काहीही आढळले नाही म्हणून या दोघांची नाव नसल्याचे पुणे पोलिसांचे स्पष्टीकरण दिले.
पार्थ पवार यांच्याविरोधात आरोपपत्र नाही, अंजली दमानिया संतापल्या
महाराष्ट्र हा फक्त राजकीय दलालीचा अड्डा झाला आहे का? कायदा फक्त सामान्यांसाठीच आहे का? राजकारण्यांसाठी ‘न्याय’ हा शब्दच रद्द झालाय का? पुणे जमीन घोटाळा… तपासाचे काहीच होत नाही… त्यात शितल तेजवानी यांनी SP Civil Suit २२१३/२०२५ दाखल केला दिग्विजय पाटील यांच्या विरुद्ध आम्हाला पैसे मिळाले नाही म्हणून हा व्यवहार रद्द करा आणि दिग्विजय पाटील यांनी SP Civil Suit २३४७/२०२५ शितल तेजवानी यांच्या विरुद्ध, आम्हाला फसवलं म्हणून हा व्यवहार रद्द करा असा अर्ज केला आहे. आणि कलेक्टर पुणे यांनी तर, हा व्यवहार ‘अवैध असून तो रद्द करण्यात यावा’ यासाठी अर्ज ८/१२/२०२५ रोजी अर्ज केला? मग साहेब पार्थ पवारांना शिक्षा कोण देणार? कशी देणार? का गुंडाळून टाकणार तुम्ही हा व्यवहार? काय ही घाण? ‘न्याय’ हा शब्द राजकारण्यांना लागूच होत नाही का? असे उद्विग्न सवाल अंजली दमानिया यांनी विचारले.
