TRENDING:

BMC Election: आजपासून महापालिका निवडणुकांचा धुरळा, उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात, युती-आघाडीचा घोळ सुटणार?

Last Updated:

Municipal Corporation Election :नगर परिषदांच्या निवडणूक निकालानंतर आता राज्यात आजपासून महापालिका निवडणुकांचा धुरळा आजपासून उडणार आहे.

advertisement
मुंबई : राज्यातील नगर परिषदांच्या निवडणूक निकालानंतर आता राज्यात आजपासून महापालिका निवडणुकांचा धुरळा आजपासून उडणार आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतींचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता राज्यातील राजकारणाचे लक्ष थेट महानगरपालिका निवडणुकांकडे वळले आहे. मंगळवारपासून मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी निवडणूक प्रक्रियेला अधिकृत सुरुवात होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र, निवडणुकीच्या तोंडावरही महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांचे चित्र अद्याप अस्पष्टच आहे. दोन्ही बाजूंमध्ये युती–आघाडीच्या चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात असले तरी ठोस निर्णय झालेला नाही.
आजपासून महापालिका निवडणुकांचा धुरळा, उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात, युती-आघाडीचा घोळ सुटणार?
आजपासून महापालिका निवडणुकांचा धुरळा, उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात, युती-आघाडीचा घोळ सुटणार?
advertisement

येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणाऱ्या २८ महानगरपालिकांमध्ये जालना आणि इचलकरंजी या नव्याने स्थापन झालेल्या दोन महानगरपालिकांचाही समावेश आहे. २८ महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना लागू असणार असून, बृहन्मुंबई महानगरपालिकेत मात्र एकसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक होणार आहे. मुंबईतील २२७ जागांसह राज्यभरात एकूण २,८६९ जागांसाठी ही निवडणूक होत असून, सर्व महानगरपालिकांची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे १६ जानेवारी रोजी होणार आहे.

advertisement

नामनिर्देशन ऑफलाईनच

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्रे आणि शपथपत्रे दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असली तरी, महानगरपालिका निवडणुकांमध्ये मात्र पारंपरिक ऑफलाईन पद्धतीनेच उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार आहेत.

राजकीय घडामोडींना वेग

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मका आणि कांद्याच्या दरात वाढ, सोयाबीनला काय मिळाला भाव?
सर्व पहा

महानगरपालिका निवडणुका जाहीर होताच राज्यातील राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. मात्र, महायुती असो वा महाविकास आघाडी, दोन्ही बाजूंमध्ये जागावाटप आणि युतीच्या समीकरणांवर अजूनही चर्चेचे गुंते कायम आहेत. जागावाटप अंतिम टप्प्यात असल्याचे दावे केले जात असले तरी, कोणत्याही महानगरपालिकेबाबत सत्ताधारी किंवा विरोधी पक्षांकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत असतानाच राजकीय अनिश्चिततेचे सावट कायम आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election: आजपासून महापालिका निवडणुकांचा धुरळा, उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात, युती-आघाडीचा घोळ सुटणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल