TRENDING:

महापालिका निवडणुकीत अजितदादांना का आठवले राजीव गांधी? 34 वर्षांपूर्वीची आठवण सांगत झाले भावूक

Last Updated:

Ajit Pawar on Rajiv Gandhi: महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले विधान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. आपल्या पहिल्या निवडणुकीपासून राजीव गांधी आणि शरद पवार यांनी दिलेल्या विश्वासाची आठवण काढत त्यांनी भावनिक भाष्य केले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

पिंपरी-चिंचवड: महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीमुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. येत्या 15 जानेवारीला मतदान होणार असून, दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 18 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. यावेळची निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि रंजक ठरणार आहे, कारण राज्यातील दोन्ही प्रमुख आघाड्यांमधील गणिते बिघडल्याचे चित्र दिसत आहे.

advertisement

राजकीय समीकरणे बदलली

सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटपावरून पेच निर्माण झाला आहे.

महायुती: भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) हे तिन्ही पक्ष बहुतांश ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणूक लढवताना दिसत आहेत.

advertisement

महाविकास आघाडी: इकडे ठाकरे बंधूंमधील (उद्धव आणि राज ठाकरे) संभाव्य युतीच्या चर्चांमुळे महाविकास आघाडीत एकवाक्यता दिसत नाहीये.

अजित पवारांच्या विधानाची चर्चा

निवडणुकीच्या या धामधुमीत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत एक मोठे विधान केले आहे, ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

advertisement

राजीव गांधींच्या आठवणींना उजाळा

आपल्या राजकीय प्रवासाचे स्मरण करताना अजित पवार भावूक झाले. त्यांनी सांगितले की, त्यांच्या पहिल्या खासदारकीच्या प्रवासात राजीव गांधी यांचा मोठा वाटा होता. राजीव गांधी आणि शरद पवार यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला उमेदवारी दिली, असे त्यांनी नमूद केले.

advertisement

ते पुढे म्हणाले की, त्याकाळी माझी स्वतःची अशी कोणतीही मोठी ओळख नव्हती. तरीही केवळ राजीव गांधी आणि आदरणीय पवार साहेबांच्या विश्वासामुळे मी निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकलो.

पिंपरी-चिंचवडचे ऋण

अजित पवारांनी आपल्या पहिल्या निवडणुकीच्या विजयाचा उल्लेख करताना सांगितले की, त्या निवडणुकीत त्यांना लाखांच्या फरकाने विजय मिळाला होता. मात्र त्यात पिंपरी-चिंचवड शहरातून मिळालेली 35 हजारांहून अधिक मतांची आघाडी त्यांच्यासाठी अत्यंत मोलाची होती.

1991ची बारामती लोकसभा निवडणूक आणि निकाल

अजित पवार यांनी 1991 मध्ये पहिल्यांदा बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. ही निवडणूक त्यांच्यासाठी आणि पवार कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. 1991 च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी 4,37,293 मते मिळवून भाजपच्या प्रतिभा लोखंडे यांचा पराभव केला होता. त्यांनी सुमारे 3,36,263 मतांच्या प्रचंड फरकाने विजय मिळवला होता. या मोठ्या विजयामुळे बारामतीवर पवारांची असलेली पकड पुन्हा एकदा सिद्ध झाली.

काकांसाठी सोडले खासदारपद

अजित पवार लोकसभेवर निवडून गेले खरे, पण दिल्लीच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये शरद पवार यांना देशाचे संरक्षण मंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली.

केंद्र सरकारमध्ये मंत्री पद स्वीकारल्यानंतर शरद पवार यांना संसदेचे सदस्य होणे अनिवार्य होते. तेव्हा अजितदादांनी आपल्या काकांसाठी (शरद पवार) फक्त सहा महिन्यांतच खासदारकीचा राजीनामा देऊन जागा रिक्त केली. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत शरद पवार बारामतीतून लोकसभेवर निवडून गेले आणि अजित पवार पुन्हा राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अमरावतीमधील प्रसिद्ध दहीवडेवाले, 80 वर्ष खवय्यांच्या जिभेची जपलीये चव, Video
सर्व पहा

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महापालिका निवडणुकीत अजितदादांना का आठवले राजीव गांधी? 34 वर्षांपूर्वीची आठवण सांगत झाले भावूक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल