TRENDING:

भाजपच्या मुस्लिम उमेदवाराचा बिनविरोध विजय, निकालाची राज्यात चर्चा; काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शेवटच्या क्षणी राजकीय गणित बदलले

Last Updated:

Bhiwandi Municipal Corporation Elections: भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी राजकीय चित्र बदलले असून भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. शेवटच्या क्षणी विरोधक माघारल्याने भाजपचे सहा उमेदवार बिनविरोध विजयी ठरले असून शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपच्या तिकिटावरून अल्पसंख्याक मुस्लिम उमेदवार अबूसूद अशफाक अहमद शेख यांचा बिनविरोध विजय झाल्याने राजकीय वर्तुळात विशेष चर्चा सुरू झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

भिवंडी: भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी राजकीय घडामोड घडली असून भारतीय जनता पक्षाने (भाजप) बिनविरोध विजयांचीहॅट्रिक’ साधत आपली ताकद दाखवून दिली आहे. शेवटच्या क्षणी विरोधकांकडून अर्ज माघारी घेतले गेल्याने भाजपचे तब्बल ५ उमेदवार बिनविरोध विजयी झाले असून, याआधी जाहीर झालेल्या एका जागेसह भाजपाचे एकूण ६ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या यशामुळे भिवंडीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

advertisement

विशेष बाब म्हणजे, या बिनविरोध विजयी उमेदवारांमध्ये अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील एका उमेदवाराचाही समावेश आहे. त्यामुळे भाजपने केवळ राजकीय बळकटीच दाखवली नाही, तर सामाजिक समावेशकतेचाही संदेश दिल्याची चर्चा शहरात सुरू आहे. पालिकेतील प्रभाग क्रमांक 18 (क) मधून पक्षाचे उमेदवार अबूसूद अशफाक अहमद शेख यांचा बिनविरोध विजय झाला आहे.

advertisement

स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजपने केरळमध्ये देखील असाच प्रयोग केला होता. त्रिशूर महानगरपालिकेतील कन्ननकुलंगरा वॉर्डातून भाजपाच्या मुस्लिम उमेदवार मुमताज यांनी विजय मिळवला होता. आता भिवंडीत मात्र भाजपने थेट मुस्लिम उमेदवाराला बिनविरोध निवडूण आणले आहे.

advertisement

अर्ज माघारीच्या अखेरच्या तासांपर्यंत चित्र अस्पष्ट असताना, शेवटच्या क्षणी घडलेल्या घडामोडींमुळे भाजपाची विजयी घोडदौड वेगाने पुढे सरकली. अनेक प्रभागांमध्ये विरोधकांनी उमेदवारी मागे घेतल्याने भाजपच्या उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला आणि त्यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला.

बिनविरोध विजयी झालेले भाजपचे उमेदवार पुढीलप्रमाणे: 

advertisement

प्रभाग क्रमांक 18 (अ) अश्विनी सन्नी फुटाणकर

प्रभाग क्रमांक 18 (ब) दीपा दीपक मढवी

प्रभाग क्रमांक 18 (क) अबूसूद अशफाक अहमद शेख

प्रभाग क्रमांक 16 (अ) परेश (राजू) चौघुले

प्रभाग क्रमांक 23 (ब) भारती हनुमान चौधरी

या निकालामुळे भिवंडी पालिकेतील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भाजपने आधीच काही प्रभागांमध्ये मजबूत संघटन उभे केले होते, त्याचा थेट परिणाम आता बिनविरोध विजयांच्या रूपाने समोर येत आहे. आगामी निवडणूक रणसंग्रामाच्या पार्श्वभूमीवर हे निकाल भाजपसाठी मनोबल वाढवणारे ठरले आहेत. भिवंडी पालिकेच्या निवडणुकीत पुढील टप्प्यात आणखी कोणकोणत्या प्रभागांमध्ये चुरस वाढणार, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

भाजपसाठी महापौरपदाची नांदी

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सतरा बंब सुमित पाटील यांनी बिनविरोध विजयाचा खाता खोलल्यानंतर, मांजरीचे शेवटच्या दिवशी परेश उर्फ राजू चौगुले, अश्विनी फुटाणकर, दीपा मढवी, अबुसाद अशपाक शेख हे चार उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. या विजयाचा जल्लोष भाजपा समर्थकांच्या वतीने जोरदार फटाकेबाजी आणि गुलाल उधळत करण्यात आला.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिल्लीत लोकांची फेव्हरेट डिश, जालन्याच्या शेतकऱ्याने केली शेती, लाखांचा फायदा
सर्व पहा

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजपच्या मुस्लिम उमेदवाराचा बिनविरोध विजय, निकालाची राज्यात चर्चा; काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शेवटच्या क्षणी राजकीय गणित बदलले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल