नागपूर : महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिल्मी स्टाईलने तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. दारू प्यायला गेलेल्या तीन मित्रांमध्ये "माझी गर्लफ्रेंड मला २० हजार रुपये देऊ शकते', या वादातून बाचाबाची झाली. त्यानंतर आरोपी मित्राने भावांना बोलवून लोखंडी रॉड आणि चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत पार्वतीनगर चौकात ३ जानेवारी रोजी रात्री ही घटना घडली. रितीक पटले असं मृत तरुणाचं नाव आहे. तर तनषू नागपूरे आणि सलीम असं जखमी झालेल्या इसमांची नाव आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर गोलू अन्सारीसह त्याच्या ५ भावांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी गव्हाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी नगरमध्ये ३ जानेवारीला ही घटना घडली. फिर्यादी तनषू नागपुरे याने तक्रार दिली दिली. फिर्यादी तनषू नागपूरे आणि मृत रितीक पटेल हे दोघे सोबत चौकाात उभे होते. त्यावेळी आरोपी गोलू अन्सारी तिथे आला आणि त्याने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पण रितीकने गोलूला पैसे नाही असं सांगितलं. काही वेळानंतर रितीक घरी गेला. त्यानंतर तिघेही दुचाकीवर मंगळवारी इथं दारू पिण्यासाठी गेले होते.
गर्लफ्रेंडवरून झाला वाद
त्यावेळी दोघांमध्ये गर्लफ्रेंडवरून वाद झाला. गोलूने, "जर मी माझ्या गर्लफ्रेंडला सांगितलं तर ती आता २० हजार रुपये पाठवू शकते", असं रितीक सांगून डिवचलं. यावरून दोघांमध्ये वाद झाला, एकमेकांना शिव्या दिल्या. त्यानंतर गोलू हा गाडी घेऊन निघून गेला. दोघे जण पायी येत होते. घरी गेल्यानंतर गोलूने आपल्या भाऊ लूकमारला सगळं सांगितलं. त्यानंतर लूकमारने फिर्यादी तनषू नागपूरे ला फोन केला आणि शिवीगाळ केली, "तुमचं खूप झालं आता तुमचे हात पाय तोडावे लागतील", अशी धमकी दिली.
त्यानंतर घराकडे येत असताना तनषू आणि रितीकला त्यांच्या परिसरात राहणारे सलीम भाई नावाचे इसम भेटले. दोघांनी सलीम यांना सगळी हकीकत सांगितली, त्यानंतर सलीम यांनी 'दोघांना असं काही होणार नाही', असं सांगितलं आणि घटनास्थळी पार्वतीनगर चौकात गेले ज्या ठिकाणी घडली. जेव्हा तनषू आणि रितीक हे सलीम यांच्यासोबत येत होते.
'गोलूने लोखंडी रॉडने रितीकला संपवलं'
गोलू आणि त्याचा भाऊ लूकमार या दोघांना वाटलं हे मारण्यासाठी आपल्याला आले आहे. आपल्यावर हल्ला करतील. त्यामुळे दोघांनी तनषू आणि रितीक यांच्यावर हल्ला केला. लोखंडी रॉड आणि चाकूने हल्ला केला. आरोपी गोलूने रितीकच्या डोक्यावर पाठीमागून लोखंडी रॉडने वार केला. वार वर्मी लागल्यामुळे रितीक जागेवरच कोसळला. तर दुसऱ्या आरोपीने सलीम यांच्यावरही चाकूने हल्ला केला. एवढंच नाहीतर भांडण होताना पाहून धाव घेतलेल्या तनसूच्या आई-वडिलांनाही बेदम मारहाण करण्यात आली. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयाात दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी गव्हाणे यांनी दिली.
या प्रकरणी सगळे आरोपी अटकेत आहे. आरोपी इशान अन्सारी आणि त्यांची पाच मुलं आरोपी आहे. गोलू अन्सारी, मुस्तफा अन्सारी, साहिद अन्सारी, सल्लाउद्दीन अन्सारी आणि लूकमार अन्सारी अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहे. यातील गोलू अन्सारी याच्यावर आधीही एक गुन्हा दाखल आहे. सर्व जखमींना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उपचारादरम्यान रितीकचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.
