भारत सरकारच्या NABARD संस्थेच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 8 नोव्हेंबर सुरू होणार असून उमेदवार 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार www.nabard.org या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (National Bank For Agriculture And Rural Development- NABARD) मध्ये सहायक व्यवस्थापक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीतून एकूण ९१ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया ग्रामीण विकास बँकिंग सेवा, कायदा आणि प्रोटोकॉल आणि सुरक्षा सेवा यांसारख्या विविध सेवांसाठी आहे.
advertisement
NABARD मधील भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व सूचना आणि पात्रता निकष काळजीपूर्वक वाचावेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करण्याची प्रक्रिया 8 नोव्हेंबर 2025 ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत चालणार आहे. अर्ज केवळ नाबार्डच्या अधिकृत वेबसाइट www.nabard.org वरूनच करता येईल. अर्जामध्ये नोंदणी, शुल्क भरणे आणि छायाचित्र, सही, डाव्या अंगठ्याचा ठसा यांसारखी स्कॅन केलेली कागदपत्रे विशिष्ट आकारात अपलोड करणे समाविष्ट आहे. जर अर्जदाराने या गोष्टी अपलोड केल्या असतील तरच अर्ज यशस्वीरित्या सबमिट होईल. ऑनलाईन अर्ज भरण्याची आणि ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख एकच आहे.
भरतीच्या माध्यमातून एकूण 91 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. असिस्टेंट मॅनेजर Grade 'A' (Rural Development Banking Service- RDBS)- 85 पदे, असिस्टेंट मॅनेजर Grade 'A' (Legal Service)- 2 पदे, असिस्टेंट मॅनेजर Grade 'A' (Protocol & Security Service)- 4 पदे अशा पद्धतीने नोकरभरतीमध्ये रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. निवड प्रक्रिया अनेक टप्प्यांमध्ये विभागली आहे, ज्यात ऑनलाइन परीक्षा, सायकोमेट्रिक चाचणी आणि मुलाखत यांचा समावेश आहे. भरती प्रक्रियेत अनेक टप्पे आहेत. परीक्षेचा पहिला टप्पा (Phase I) - ऑनलाइन परीक्षा 20 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. दुसरा टप्पा (Phase II) - ऑनलाइन परीक्षा (RDBS/Legal साठी) 25 जानेवारी 2026 रोजी नियोजित करण्यात आली आहे. तिसरा टप्पा (Phase III) - सायकोमेट्रिक चाचणीच्या तारखा नंतर जाहीर केल्या जातील. नाबार्डला या परीक्षांच्या तारखा बदलण्याचा अधिकार आहे. तारखांची माहिती जाहिरातीत दिली आहे.
भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रात ग्रेजुएशन/ पोस्ट ग्रेजुएशन/ एमबीए/ पीजीडीएम/ सीए/ सीएस/ आयसीडब्ल्यूए उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता 1 नोव्हेंबर 2025 रोजी किंवा त्यापूर्वी पूर्ण झालेली असावी. यासोबतच, भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारासाठी किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे निश्चित करण्यात आलं आहे. RDBS पदासाठी 85 जागा असून खुला प्रवर्ग, अनुसूचित जाती- जमाती, इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक श्रेणींमध्ये विभागल्या आहेत. सहायक व्यवस्थापक (RDBS/Legal) पदासाठी वयोमर्यादा 1 नोव्हेंबर 2025 रोजी 21 ते 30 वर्षे आहे, ज्यात खुला प्रवर्ग, अनुसूचित जाती- जमाती, इतर मागासवर्ग आणि अपंग व्यक्ती यांसाठी वयात सवलत आहे. सहायक व्यवस्थापक (Protocol & Security Service) पदासाठी वयोमर्यादा 25 ते 40 वर्षे असून, कोणत्याही श्रेणीसाठी वयात सवलत नाही.
सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे. भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी एससी (SC), एसटी (ST) आणि पीडब्ल्यूबीडी (PwBD) प्रवर्गातील उमेदवारांना 150 रुपये अर्जाचं शुल्क भरावं लागेल. तसेच, इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांना 850 रुपये अर्जाचं शुल्क आकारण्यात येईल. उमेदवार ऑनलाइन माध्यमातूनच अर्जाचं शुल्क भरू शकतात. निवडलेल्या उमेदवारांना सुरुवातीचा मासिक पगार 1,00,000 रुपये मिळेल. मूळ वेतन 44,500 रुपये असेल. त्यांना गृहनिर्माण, वाहन कर्ज, पेन्शन आणि रजा असे फायदे देखील मिळतील.
