नाग पकडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. केंद्राच्या वन मंत्रालय आणि वन्यजीव विभागाकडून ही परवानगी देण्यात आली आहे. मात्र, उद्या मंगळवारी शिराळा येथे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारचं नागपंचमी होणार असल्याचं गावकऱ्यांनी ठरवलं आहे.
सांगलीच्या ३२ शिराळ्यास नागपंचमीची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. जिवंत नागाच्या पूजेसाठी जगप्रसिद्ध असलेल्या शिराळ्यात 2002 च्या शासन नियमानुसार जिवंत नागाची पूजा करण्यास मनाई आहे. त्यामुळे शिराळकर नागप्रेमी अलीकडे जिवंत नागाऐवजी प्रतीकात्मक नागाची पूजा करतात. पण, ऐन नागपंचमीच्या पूर्वसंध्येला केंद्राच्या वन मंत्रालय आणि वन्यजीव विभागाकडून खास परवानगी दिली आहे. २१ शिराळकरांना नाग पकडण्यास परवानगी दिली आहे. शैक्षणिक अभ्यास आणि सर्प संवर्धन विषयी पारंपारिक प्रसार करण्याकामी परवानगी देण्यात आली आहे. 27 जुलै 31 जुलैपर्यंत नाग पकडून त्याचा उपयोग शैक्षणिक अभ्याससाठी आणि प्रसार प्रचारासाठी करण्याचे निर्देश दिले आहे. मनोरंजन,खेळ,मिरवणूक आणि व्यवसायिक कामासाठी या नागांचा उपयोग केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा सांगलीच्या वन विभागाचे वन उपसंरक्षक अधिकारी सागर गवते यांनी दिली.
advertisement
काय आहे सरकारचा नवीन आदेश
शिराळा वनक्षेत्रातील २१ ग्रामस्थांनी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ मधील नियम क्र. १२ अन्वये विशेष उद्देशामधील अभ्यास / शिक्षण करणेकामी नाग पकडण्यासाठी मंजुरीबाबत विहित नमुन्यात परवानगी मागणी केलेली होती. त्यानुसार पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन मंत्रालय, वन्यजीव विभाग नवी दिल्ली यांचेकडून Deputy Inspector General of Forests (WL) यांचेकडील दिनांक २७/०७/२०२५ रोजीचे पत्रान्वये २१ अर्जदारांना नाग पकडणेसाठी २७ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत अटी शर्तीस अधिन राहून परवानगी देणेत आलेली आहे. तरी सदरची परवानगी ही केवळ शैक्षणिक उद्देशासाठीच व स्थानिक लोकांमध्ये, समाजामध्ये सर्प संवर्धनाविषयी पारंपारीक ज्ञान प्रसारण होणेकामी अनुमती देणेत आलेली आहे. यामध्ये कोणतीही व्यावसायीक किंवा मनोरंजन, स्पर्धा, मिरवणूक, खेळ, याला अटकाव करणेत आलेला आहे. तसंच ज्या अर्जदारांना परवानगी मिळालेली आहे त्यांनी सदरचे नाग पकडताना मुख्य वन्यजीव संरक्षक किंवा त्यांच्याकडून अधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फतच वन आणि वन्यजीव अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करणेबाबत बंधन घालणेत आले आहे. यामध्ये नागांचा एकही मृत्यू होणार नाही आणि नाग सुरक्षितपणे मूळ अधिवासात सोडणेबाबत सूचना करणेत आलेल्या आहेत. तरी या २१ अर्जदारांव्यतिरिक्त कोणीही नाग पकडल्यास तसंच स्पर्धा, मिरवणूक, खेळ, केल्याचे आढळून आल्यास त्यावर वन्यजीव अधिनियम, १९७२ नुसार गुन्हा नोंद करणेत येईल.