TRENDING:

Nagpur Crime : 'झुंड' चित्रपटात झळकलेल्या ‘बाबू छत्री’ची निर्घृण हत्या,अर्धनग्न केलं, तारांनी बांधलं मग चाकूने...भयंकर घटना

Last Updated:

: बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'झुंड' चित्रपटात झळकलेल्या ‘बाबू छत्री’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियांशू या कलाकाराची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Nagpur Crime News : बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'झुंड' चित्रपटात झळकलेल्या ‘बाबू छत्री’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियांशू या कलाकाराची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.काही अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्रांनी प्रियांशूवर हल्ला करून त्याची हत्या केल्याची माहिती आहे. नागपुरातील नारा वस्ती परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली असून कसून तपासाला सूरूवात केली आहे.
jhund film priyanshu alias babu chhatri
jhund film priyanshu alias babu chhatri
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, 'झुंड' चित्रपटात झळकलेला ‘बाबू छत्री’ हा एक कुख्यात गुन्हेगार होता. त्याच्याविरूद्ध नागौर पोलिसांच्या नोंदींमध्ये गुन्हे दाखल होते.दरम्यान मंगळवारी रात्री नागपूरच्या जरीपटका पोलिस स्टेशन हद्दीत ‘बाबू छत्री’ याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. किरकोळ वादातून ही हत्या झाल्याची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बाबू छत्री’ला तारांनी बांधून त्याच्यावर अज्ञातांनी धारदार शस्त्राने हल्ला केला होता.त्यासोबत त्याच्यावर चाकूने वार करण्यात आले होते.यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला होता. या घटनेची माहिती पोलिसांनी मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन बाबू छत्री याला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले होते.

advertisement

धक्कादायक म्हणजे, पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना बाबू छत्री अर्धनग्न अवस्थेत आढळला होता, त्याच्या शरीराभोवती प्लास्टिकची तार गुंडाळलेली होती. यावेळी स्थानिकांनी आरडाओरड केल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती. प्राथमिक तपासात बाबू छत्रीचा स्थानिक गुन्हेगारी घटकांशी वाद असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हत्येचा नेमका हेतू अजून स्पष्ट झालेला नाही. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी ध्रुव शाहू यास अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास वेगाने सुरू आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कफ सिरप ठरतंय लहान मुलांसाठी धोकादायक, पालकांनी काय काळजी घ्यावी? Video
सर्व पहा

मृत बाबू छत्री हा मेकोसाबागचा रहिवासी होता, तर अटक केलेला आरोपी ध्रुव साहू हा नारा कॉम्प्लेक्सचा रहिवासी आहे. दोघांवरही चोरी आणि मारहाणीसह पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत.त्यामुळे किरकोळ वादातून ही हत्या झाल्याची माहिती आहे.या घटनेने नागपूरमध्ये खळबळ माजली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nagpur Crime : 'झुंड' चित्रपटात झळकलेल्या ‘बाबू छत्री’ची निर्घृण हत्या,अर्धनग्न केलं, तारांनी बांधलं मग चाकूने...भयंकर घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल