पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरूण हा संगीत शिकवण्याचं काम करतो. त्याचं स्वत:चा एक क्लासेस देखील आहे. एके दिवशी त्याची इंस्टाग्रामवर एका तरूणीशी मैत्री झाली होती. या मैत्रीनंतर दोघांनी एकमेकांशी चॅट करण्यास सूरूवात केली होती. यानंतर ही मैत्री पुढे जाऊन आणखीणच घट्ट होत गेली. आरोपीचं गाण शिकवण्याचं काम तरूणीला आवडायचं म्हणून तरूणीने त्याच्यासोबत एकत्र काम करायला सूरूवात केली होती.
advertisement
या कामामुळे दोघं आणखीणच जवळ आले होते आणि एकमेकांच्या प्रेमात देखील पडले होते.त्यानंतर एप्रिल 2025ला आरोपी पिडीत तरूणीला हॉटेल पॅरेडाईसवर घेऊन गेला होता.यावेळी हॉटेलवर आरोपीने पिडीतेला लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने बलात्कार केला होता.
या घटनेनंतर पीडित तरूणी प्रचंड घाबरली होती. पण तिने स्वत:ला धीर दिला कारण तिच्या प्रियकराने तिला लग्नाचे आमिष दाखवले होते. पण त्यावेळेस तिला या गोष्टीचे अजिबात कल्पना नव्हती की आरोपी लग्नाच्या आमिषाच्या नावाखाली तिच्यासोबत बलात्कार करतोय. पुढे जाऊन अशाच प्रकारे तरूणीला हॉटेलवर नेऊन त्याने वारंवार तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्तापित केले होते.
दरम्यान काही महिन्यानंतर पीडितेने वारंवार लग्नाविषयी विचारल्यावर आरोपी टाळाटाळ करू लागला.त्यामुळे पीडितेच्या मनात पाल चुकचुकली आणि तिने थेट पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी तरूणाविरूद्ध कपिल नगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. प्रशांत मराठे (वय 28) असे या आरोपीचे नाव आहे. या आरोपीला कोर्टात हजर केले असता न्यायालयाने 4 दिवसांची कोठडी सूनावण्यात आली होती.
26 वर्षीय पीडित तरूणीने 13 ऑक्टोबरच्या रात्री पोलीस ठाणे गाठून तक्रार केली होती. या घटनेत आरोपी प्रशांतसोबत तिची इंस्टाग्रामवर मैत्री झाली होती.प्रशांत हा गाण्याचे क्लासेस चालवायचा. प्रशांतचे हे काम पाहून पीडीतेने त्याच्यासोबत काम करण्यास सूरूवात झाली होती.यामुळे दोघे आणखीणच जवळ आले होते. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून प्रशांतने पीडितेवर वारंवार बलात्कार केला.या बलात्काराला कंटाळून अखेर पीडितेने तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुप्रिया गजरे यांनी दिली.