नागपूर महानगरपालिकेच्या एकूण १५१ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत सुरुवातीपासूनच चुरस पाहायला मिळाली. मात्र, मतमोजणीच्या पहिल्या काही फेऱ्यांमध्ये भाजपने ३५ जागांवर आघाडी घेत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. काँग्रेस १५ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने २ जागांवर आघाडी मिळवली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि ठाकरे गट यांना अद्याप खाते उघडता आलेले नाही.
advertisement
नागपूर महानगरपालिका निकाल (एकूण जागा १५१)
भाजप -३५
काँग्रेस- १५
शिवसेना (शिंदे गट)- ०२
शिवसेना (ठाकरे गट)- ००
राष्ट्रवादी (अजित पवार)- ००
राष्ट्रवादी (शरद पवार)- ००
मनसे- ००
इतर / अपक्ष- ००
गेल्या काही वर्षांत नागपुरात काँग्रेसने आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसला अपेक्षित यश मिळताना दिसत नाहीये. भाजपच्या 'मिशन १२२+' समोर काँग्रेसची पिछेहाट होताना दिसत आहे. दुसरीकडे, मनसे आणि शरद पवार गटालाही अद्याप आपला प्रभाव पाडता आलेला नाही.
राजकीय वर्चस्वाची लढाई
नागपूर महानगरपालिका ही भाजपसाठी प्रतिष्ठेची लढाई आहे. गेली १५ वर्षे या पालिकेवर भाजपची सत्ता आहे. यंदाही विकासकामांच्या मुद्द्यावर भाजपने मतदारांना साद घातली होती. सुरुवातीचे कल पाहता, नागपूरकरांनी पुन्हा एकदा 'कमळा'वर विश्वास दाखवल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
