नागपूर मेट्रोच्या नारी स्टेशनवर हा धक्कादायक प्रकार घडला आहे.या स्टेशनवर आशिष पोटमारे हे तिकीट चेकर म्हणून कर्तव्यावर होते.यावेळी घटनेच्या काही मिनिटाआधी एक मेट्रो नारी स्टेशनवर आली होती. या मेट्रोतीन काही टवाळखोर पोरं उतरली होती. या पोरांच्या टोळीला पाहून तिकीट चेकर आशिष पोटमारे यांनी त्यांच्याजवळ तिकीटाची मागणी केली होती. यावेळी पोरांकडे तिकीट होते पण ते भलत्याच स्टेशनला उतरली होती.त्यामुळे पोटमारे यांनी त्यांच्यावर दंड आकारायचा प्रयत्न केला होता. याच राग मनात धरून एकाने आशिष पोटमारे यांचं डोकं फोडल्याची घटना घडली आहे. या घटनेत आशिष पोटमारे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सूरू आहे.
advertisement
खरं तर या घटनेतील आरोपी आणि त्याच्या दोन साथिदारांनी सीताबर्डी ते झिरो माईल या दरम्यानचा तिकीट घेतले होते.पण हे तिघे झिरो माईलवर न उतरता नारी स्थानकात उतरले होते.त्यानंतर तिकीट चेकर आशिष पोटमारे यांनी त्यांना पाहताच तिकीटाची मागणी केली.यावेळी तिकीट चेक केले असता तिघेही तिकीट न घेतलेल्या स्थानकार उतरले होते.त्यामुळे आशिष पोटमारे यांनी त्यांना दंड ठोठावला.हा दंड देखील आरोपीने भरला. परंतू तिकीट घेण्यास नकार देत त्याने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यात वाद वाढताच आरोपीने जवळच असलेल्या दगडाने आशीष पोटमारे यांच्या डोक्यात दगड मारला.या आशिष गंभीररित्या जखमी झाले होते.त्यामुळे त्यांना तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांच्यावर उपचार सूरू आहे.
दरम्यान या घटनेनंतर आशिष पोटमारे यांच्या तक्रारीवरून आरोपी पांचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी शेख इरफान शेख कमरुद्दीन याला अटक केली आहे. तसेच इरफान सोबत असलेले दोन जण फरार झाले आहेत.हे दोघेही छत्तीसगडचे असल्याची माहिती आहे. पोलिसांनी या आरोपीचा शोध सूरू केला आहे. पण या घटनेने नागपूर हादरलं आहे.