नागपूर : महायुती सरकारमध्ये नेते आणि मंत्री या ना त्या कारणामुळे वादात सापडले आहे. एकीकडे तिजोरीमध्ये खडखडात असताना मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. नागपूरमधील मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असल्याची माहिती न्यूज१८ लोकमतने समोर आणली होती. अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बातमीची दखल घेतील असून अवांतर खर्च होणार नाही, असं आश्वासन दिलं आहे.
advertisement
नागपूरमध्ये आता हिवाळी अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अनेक मंत्र्यांच्या बंगल्याच्या दुरस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. पण ८ ते १० दिवसांच्या हिवाळी अधिवेशनासाठी सहा खोल्यांच्या बंगल्याच्या दुरुस्तीसाठी तब्बल एक कोटींपेक्षा जास्त खर्च असल्याचं समोर आलं. मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असल्याची बातमी बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या बातमीची दखल घेतली. या संदर्भात माहिती घेऊन अवांतर खर्च होऊ देणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
35 लाखांच्या कामासाठी 1 कोटींचं टेंडर
एवढंच नाहीतर न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर गुरुवारी दुपारी मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचा खुलासा केला आहे. मंत्र्यांच्या बंगल्यावर 35 लाख रुपये देखभाल दुरुस्तीसाठी खर्च केला जाणार आहे.आधी याच बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी 1 कोटी रुपयांचं टेंडर काढण्यात आलं होतं.
कृषीमंत्र्यांच्या बंगल्यासाठीच 1 कोटींची उधळपट्टी
नागपूरमध्ये कृषीमंत्री दत्ता भरणे यांच्या सरकारी बंगल्याच्या दुरुस्तीसाठी तब्बल एक कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात येणार होता. राज्यातील शेतकरी संकटात असताना कृषिमंत्र्यांच्या बंगला दुरुस्तीसाठी उधळपट्टी होत असल्यामुळे विरोधकांनी टीका केली. नागपूर रविभवन येथील दत्ता भरणे यांच्या २९ नंबरचा बंगला दुरुस्तीसाठी एक कोटींपेक्षा जास्त खर्च काढण्यात आला होता.
कृषिमंत्र्यांच्या बंगल्याचा कायापालट करण्यात येणार होता. यामध्ये संपूर्ण छत उघडलं, टाईल्स उखडल्या. यासह आणखी दोन बंगल्यावर कोट्यवधीचा खर्च काढण्यात आला होता. यामध्ये फेब्रिकेशन सिलिंग लोखंडी ढाचा 5 लाख, टाईल्स 7 लाखाचा खर्च, प्लंबिंग 3 लाख, पेंटिंग आतून बाहेरून 4 लाख, अल्युमिनियम खिडक्या 2.50 लाख, नळ फ़िटिंग, कंपन्यांचा महागडे 3 लाख, बाहेरून वरचे सिलिंग सीट 5 लाख, इलेक्ट्रिक फिटिंग 5 ते 7 लाख, फर्निचर 15 लाख, आतील सिलिंग 12 लाख, दरवाजे 10 ते 12 लाख, वुडन फ्लोरिंग 10 लाख आणि पडदे, कपडे, गाद्या, किरकोळ खर्च काढण्यात आला होता.
कोणत्या मंत्र्यांच्या बंगल्याचं होणार आहे काम?
देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री
मुख्यमंत्री सचिवालय
हैदराबाद हाऊस
खर्च - 2 कोटी
सिलिंगचं काम
----------
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देवगिरी
खर्च - 90 लाख
नव्या रूमचं बांधकाम
दत्ता भरणे
कृषीमंत्री
कॉटेज नं. 29
खर्च - 1.9 कोटी
नव्यानं स्ट्रक्चर उभारणी
--------------
राहुल नार्वेकर
विधानसभा अध्यक्ष
कॉटेज नं. 1
खर्च -1.6 कोटी
सिलिंग, टाईल्स, फर्निचर, रंगकाम
-------
रवीभवन, नागभवन, हैदराबाद हाऊस कॉटेजेस
खर्च
दुरुस्तीची कामं - 93 लाख
इलेक्ट्रिकल कामं - 1 कोटी
चादर, बेड, इतर वस्तू खरेदी 20 कोटी
