मिळालेल्या माहितीनुसार, साजन मिश्रा हे रेती आणि बिल्डिंग मटेरियल सप्लायर व्यावसायिक होते. शनिवारी दुपारी ते घरातून बाहेर पडले, मात्र रात्री उशिरापर्यंत परत घरी आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यावेळी त्यांना साजनची बोलेरो कार पाटणसावंगीजवळील लाहोरी इन बार अँड रेस्टॉरंटसमोर उभी असलेली दिसली. त्यांनी गाडीजवळ जाऊन पाहणी केली असता, कारच्या ड्रायव्हिंग सीटवर साजन मृतावस्थेत आढळले.
advertisement
ही घटना उघडकीस येताच त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. साजन यांचा मृत्यू दारूच्या अतिसेवनाने झाला की त्यांची हत्या झाली, यावर आता चर्चा सुरू आहे. त्यांच्या मृतदेहाची परिस्थिती पाहता घातपाताची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीही केली जात आहे. पोलीस तपासाअंतीच साजन यांच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईल, असं पोलिसांकडून सांगण्यात येतंय. पुढील तपास केला जात आहे.