आर. जानकीरमण अय्यर असं या नागपूरकरांचं नाव आहे. ते इंडियन ऑडिट्स अँड अकाऊंट्स डिपार्टमेंटमधून निवृत्त झाले आहेत. त्यांनी रद्दीच्या कागदाचा वापर करत काही अप्रतिम कलाकृतीची निर्मिती केलीय. रोजचा पेपर वाचल्यानंतर आपण तो रद्दीत टाकतो. या रद्दीच्या पेपरपासूनच त्यांनी या कलाकृती घडवल्यात.
advertisement
जानकीरामण यांनी यापासून छत्रपती शिवाजी महाराज, गौतम बुद्ध, नटराज, तिरुपती बालाजी, राधा-कृष्ण या सारख्या कलाकृती साकारल्यात. 'कोरोना महामारीच्या काळात घरात बसून काय करायचं हा प्रश्न होता. त्यावेळी मला ही कल्पना सुचली. सुरुवातीला ओबडधोबड कलाकृती तयार झाल्या. त्यानंतर सरावानं यामध्ये सुधारणा झाली, असं जानकीरमण यांनी सांगितलं.
'मी निवृत्तीनंतर या कामासाठी पूर्ण वेळ देतो. सकाळी 7.30 ते रात्री 11 पर्यंतचा सर्व वेळ मी यासाठी खर्च करतो. आजवर अनेक ठिकाणी मी या कलेचं प्रदर्शन भरवलंय. त्यासाठी मला पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं आहे,' असं त्यांनी सांगितलं.
वकिलाच्या बायकोनं केली कमाल, 23 वर्षांपासून करतेय शेती, स्वत: चालवते ट्रॅक्टर, प्रेरणादायी कहाणी
पत्नीची खंबीर साथ
'मी हे काम अगदी तल्लीन होऊन करतो. त्यावेळी मला चहा किंवा जेवणाचं ताट जागेवरच मिळतं. कागदी पेपरचा होणारा कचरा किंवा घरातल्या पसाऱ्याबाबत माझी पत्नी कधीही तक्रार करत नाही. तिचंही माझ्या कलेवर प्रेम आहे. तिची भक्कम साथ असल्यानंच मी या कलाकृती करु शकतो, ' असं जानकीरमण यांनी सांगितलं.