बाहेरील रिंग रोडवरून प्रवास अनिवार्य
जड वाहनांना शहरात थेट प्रवेश नाकारण्यात आला असून, त्यांना आता आऊटर रिंग रोडचा वापर करणे बंधनकारक असणार आहे. रेल्वे मालटर्मिनल, अजनी, कलमना, खापरखेडा, कांदळी यांसारख्या भागात जाणाऱ्या वाहनांनी रिंग रोडवरूनच वळसा घालावा लागणार आहे. या निर्णयामुळे वाहतूकदारांमध्ये खळबळ उडालेली बघायला मिळत आहे.
मोठी बातमी! नागपुरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार, लवकरच 'रिंग रोड' होणार, कसा आहे प्लॅन?
advertisement
8 सप्टेंबरपासून नियमांची अंमलबजावणी
वाहतूक पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांनी काढलेल्या आदेशानुसार हा नियम 8 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. त्यामुळे शहरात जड वाहनांची दहशत मोठ्या प्रमाणात आटोक्यात येईल, असा विश्वास प्रशासन व्यक्त करत आहे. जड वाहनांमुळे शहरात अनेक अपघात झाले आहेत. मागील पाच वर्षांत जड वाहनांच्या धडकेत तब्बल 477 नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे हा कठोर निर्णय महत्वाचा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
कोणत्या वाहनांना सूट?
शहरातील आवश्यक सेवांसाठी काही वाहनांना मात्र सूट देण्यात आली आहे. त्यामध्ये महानगर पालिकेची वाहने, अग्निशमन दल, सैन्य दल, दूध वाहतूक करणारी वाहने, भाजीपाला, फळं व धान्य वाहतूक करणारी वाहने, औषध पुरवठा करणारी वाहनं, गॅस सिलिंडर वाहतूक करणारी वाहनं, डाक विभागाची वाहनं या वाहनांना मात्र वेळेची मर्यादा लागू होणार नाही.
जड वाहनांमुळे होणारी गर्दी, अपघात व प्रदूषणामुळे त्रस्त असलेल्या शहरवासीयांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. “शहरातील मुख्य रस्ते मोकळे होतील, अपघात टळतील आणि वाहतुकीत शिस्त येईल,” अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.