समीर शेख ऊर्फ येडा शमशेर खान असे मृत गुंडाचे नाव आहे. त्याची कुऱ्हाड आणि बेसबॉलच्या बॅटने वार करून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही हत्या गुन्हेगारी टोळ्यांमधील वर्चस्वाच्या लढाईतून झाली असावी असा अंदाज आहे.
मृत समीर शेख हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील हिस्ट्रीशीटर असून, त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, प्राणघातक हल्ला, गांजा तस्करी अशा प्रकारचे तब्बल ३१ गंभीर गुन्हे दाखल आहेत. यशोधरानगर परिसरात गुन्हेगारी टोळ्यांमधील स्पर्धा आणि वर्चस्ववाद नेहमीच चर्चेत असतो. याच वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
advertisement
समीर शेखच्या हत्येची माहिती मिळताच यशोधरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके तात्काळ कामाला लागली आहेत. अजूनपर्यंत आरोपींचा कोणताही सुगावा लागलेला नाही. ही हत्या कोणी केली आणि त्यामागे नेमके काय कारण आहे, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून, पोलीस पुढील कारवाई करत आहेत.