याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या अभियानाअंतर्गत जिल्हा, तालुका तसेच गावपातळीपर्यंत नेत्रशिबिरांचं आयोजन केलं जाणार आहे. शासकीय रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालये आणि स्वयंसेवी संस्थाही या उपक्रमात सहभागी होणार आहेत. शिवाय, मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना मोफत चष्मे दिले जाणार आहेत. काचबिंदूसह इतर नेत्रविकारांवरील निदान, सल्ला आणि उपचारही केले जाणार आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांपर्यंत मोफत सेवा पोहोचवणे, हे अभियानाचं प्रमुख उद्दिष्ट आहे.
advertisement
Viral Diseases: कोणाला ताप तर कोणाचं नाक गळतंय! मुंबईतील रुग्णसंख्येत अचानक वाढ, कारण काय?
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात दरवर्षी लाखो नागरिक मोतीबिंदू, काचबिंदू आणि इतर नेत्रविकारांनी आपली दृष्टी गमावत आहेत. विशेषतः 50 वर्षांवरील नागरिकांमध्ये मोतीबिंदूचे प्रमाण सर्वाधिक आहे. ग्रामीण भागात योग्य उपचार न मिळाल्याने अनेक रुग्ण दृष्टी गमावतात. यावर उपाय म्हणून हा विशेष उपक्रम राबवला जात आहे.
या अभियानांतर्गत गरजूंना मोफत शस्त्रक्रिया आणि औषधोपचार सुविधा मिळणार आहेत. मोतीबिंदू आणि इतर नेत्ररोगांवर उपचार करून रुग्णांच्या दृष्टीसंबंधी समस्या दूर करण्यात येत आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या लोकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यास मदत होत आहे.