Nanded Crime News : मुजीब शेख,प्रतिनिधी,नांदेड : नांदेडमधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एका शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने एका विद्यार्थीनीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. नांदेड शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हा संपूर्ण प्रकार घडला आहे. या घटनेची माहिती मुलीने आपल्या कुटुंबियांना दिल्यानंतर या घटनेया उलगडा झाला आहे. या घटनेने सध्या नांदेड हादरलं आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत 7 वर्षीय चिमुकली ही शिकायला जायची. याच शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षकाची चिमुकलीवर वाईट नजर पडली आणि त्याने शिकवणी घेण्याच्या बहाण्याने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. 19 नोव्हेंबर 2025 ला शाळेत हा सगळी घटना घडली होती.
या घटनेनंतर चिमुकलीने या संपूर्ण घडलेल्या घटनेची माहिती दिली होती.त्यानंतर मुलीच्या आईने नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाणे गाठत नराधम शिक्षकाविरूद्ध तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित शिक्षकाला अटक केली आहे. ईशांत इंगोले असे या नराधम शिक्षकाचे नाव आहे. या नराधम शिक्षकाविरूद्ध बलात्काराचाही गुन्हा दाखल झाला होता.त्याचसोबत आरोपी ईशांत इंगोले याला न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेनंतर स्थानिकांमध्ये प्रचंड संताप आहे.कारण आज रात्री काही. युवकांनी आरोपी शिक्षकाच्या घरावर शाहीफेक केला होता. तसेच आरोपीला फाशीची शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पीडितेच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याच्या सात वर्षाच्या मुलीवरती शाळेतच एका शिक्षकाने अतिप्रसंग केला होता.या प्रकरणी पीडितेच्या आईचा जबाब घेऊन संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच या घटनेतील आरोपीला ताब्यात घेतलेले आहे. तसेच या प्रकरणात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात येईल आणि सदरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची विनंती करण्यात येईल, अशी माहिती भाग्यनगर पोलिसांनी दिली आहे.
