नांदेड जिल्ह्यातील भारा नगरपरिषदा आणि लोहा नगरपंचायतीसाठी मतमोजणी सुरू आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील अनेक नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. काँग्रेस सोडून भाजपात आलेले अशोक चव्हाण यांच्या पारंपरिक भोकत मतदारसंघात नगरपरिषद निवडणूक आहे. भोकर नगर परिषदेसाठी भाजपासह काँगेस , शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांनी ताकत लावलेली आहे. ही निवडणूक अशोक चव्हाण यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. तसंच
advertisement
अशोक चव्हाण यांचे राजकीय विरोधक राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासाठी देखील ही निवडणूक महत्त्वाची आहे. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या लोहा मतदारसंघात लोहा आणि कंधार मध्ये राष्ट्रवादीला वर्चस्व सिद्ध करणं महत्त्वाचं आहे. पण, लोहामध्ये चिखलीकरांना धक्का बसला आहे.
लोहा नगरपंचायत निवडणुकीत भाजपच्या घराणेशाहीला मतदारांनी नाकारलं आहे. लोहा नगरपंचायतीमध्ये भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार गजानन सूर्यवंशी यांच्यासह परिवारातील सर्व सहा उमेदवारांचा पराभव झाला आहे. नगराध्यक्षपदासाठी गजानन सूर्यवंशी रिंगणात होते. तर पत्नी गोदावरी गजानन सूर्यवंशी (प्रभाग 7 अ) , भाऊ सचिन सूर्यवंशी (प्रभाग क्रमांक १ अ), भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी (प्रभाग 8 अ), मेव्हुणा युवराज वसंतराव वाघमारे (प्रभाग क्रमांक ७ ब) तर भाच्याची पत्नी रिना अमोल व्यवहारे (प्रभाग क्रमांक ३) मधून निवडणूक लढवत होते. हे सहाही उमेदवार पराभूत झाले आहे.
लोह्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार शरद पवार यांचा विजयी झाला आहे. लोहा नगरपालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 17 जागा तर उद्धव ठाकरे गट, भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी एका जागेवर विजयी झाले आहे. आमदार चिखलीकरांनी मतदारसंघातील लोहा नगरपालिका राखली तर कंधारमध्ये पराभव झाला आहे.
शिवाय अन्य मतदारसंघात महायुतीच्या आमदारांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. धर्माबाद नगरपरिषदेत बोगस मतदारांना डांबून ठेवण्याचा प्रकार घडला होता. मतदारांना पैसे वाटपाचा प्रकारे उघड झाला होता. त्यामुळे धर्माबादच्या निकालाकडे लक्ष लागलं आहे.
