काँग्रेसचे आमदार वसंत चव्हाण यांचे 26 ऑगस्ट रोजी अकाली निधन झाले होते. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने नांदेडची जागा रिक्त झाल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला 30 ऑगस्ट रोजीच कळविली होती. त्यामुळे देशातील दोन जागांवर लोकसभा पोटनिवडणूक जाहीर केली आहे. यामध्ये नांदेडचे दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनानंतर नांदेडमध्ये लोकसभा पोटनिवडणूक लागली आहे. तर राहुल गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघ सोडला होता. या जागेवर देखील पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.
advertisement
देशातील 2 लोकसभेची जागा आणि 15 विधानसभेच्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झालीये. त्याचा संपूर्ण कार्यक्रम देखील जाहीर झालाय. महाराष्ट्रात नांदेडच्या जागेवर पोटनिवडणूक लागल्याने निवडणूक बिनविरोध होणार का? असा सवाल विचारला जात आहे.
नांदेड पोटनिवडणुकीचं वेळापत्रक
नामांकन दाखल करण्याची मुदत २९ ऑक्टोबरपर्यंत २०२४ पर्यंत असेल. तर दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाची पडताळणी करण्याची तारीख ३० ऑक्टोबर २०२४ देण्यात आली आहे. त्याचबरोबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस ४ नोव्हेंबर २०२४ असेल. त्यानंतर २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान पार पडेल. तर अंतिम प्रक्रिया म्हणजेच मतमोजणी २३ नोव्हेंबर २०२४ पर्यंत पार पडणार आहे.