नांदेड जिल्ह्यातील मुखेडमध्ये सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुखेड तालुक्यातील वसुर तांडा येथील ताऊबाई चव्हाण हिचा विवाह 2 जुलै रोजी राठोडवाडी येथील सुधाकर राठोड याच्याशी झाला होता.
गेल्या आठवड्यात ७ तारखेला नवविवाहिता माहेरी आली. पुन्हा ८ तारखेला लगोलग नवविवाहिता सासरी गेली. ९ तारखेला मुलीला उलट्या होत असल्याचा फोन माहेरी आला. सुरुवातीला ताऊबाईवर मुखेड येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी हैद्राबादला हलविण्यात आले. उपचारादरम्यान १३ जुलै रोजी नवविवाहितेचा मृत्यू झाला.
advertisement
हुंड्यासाठीच मुलीला विष पाजवून मारण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. एकूण ६ लाख रुपये हुंडा देण्याचे ठरले होते. ५ लाख रुपये हुंडा लग्नात देण्यात आला होता. पण एक लाख रुपयासाठी विष पाजून मुलीची हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय.
या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात खून आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान आरोपी पतीसह सासू, सासरे अशा चौघांना अटक करण्यात आली असून विवाहितेला विष पाजन्यात आले का? की तिने स्वतः विष प्राशन केले? याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिली.