TRENDING:

Ashok Chavan : अशोक चव्हाणांच्या पत्नी आणि कन्येला मराठा आंदोलकांनी अडवले; नेमकं काय घडलं?

Last Updated:

Ashok Chavan : अशोक चव्हाण यांच्या पत्नी आणि कन्येला नांदेड जिल्ह्यातील 2 गावात मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नांदेड, (मुजीब शेख, प्रतिनिधी) : नांदेड : भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांच्या पत्नी माजी आमदार अमिता चव्हाण आणि श्रीजया चव्हाण यांना पुन्हा एकदा मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. अर्धापूर तालुक्यातील देगाव आणि धामदरी या दोन गावात आज हा प्रकार घटला. भोकर विधानसभेतून अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी चव्हाण कुटुंबीयांचे गावोगावी भेटीगाठी सुरू आहेत. दरम्यान आज माजी आमदार अमिता चव्हाण ह्या अर्धापूर तालुक्यात गावभेटीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी मराठा तरुणांनी त्यांना जाब विचारला. सोमवारी धाराशिवमध्ये राज ठाकरेंना अशाच आंदोलनाचा सामना करावा लागला होता.
News18
News18
advertisement

चव्हाण कुटुंबियांना पुन्हा एकदा धक्का

भाजपा खासदार अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण आणि कन्या श्रीजया चव्हाण यांना आज पुन्हा एकदा मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील देगाव आणि धामदरी या दोन गावात त्यांना मराठा आंदोलकांनी अडवले. अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण ह्या भोकर विधानसभा मतदार संघातून निवडणुकीची तयारी करत आहेत. त्यासाठी अमिता चव्हाण आणि श्रीजया चव्हाण ह्या दररोज भोकर मतदार संघातील गावाना भेटी देत आहेत. आज देखील त्या गावभेटीसाठी गेल्या होत्या. तेव्हा देगाव येथे त्यांना मराठा आंदोलकानी अडवून आरक्षणाबाबत जाब विचारला. तर धामदरी येथे देखील मराठा आंदोलकांनी अमिता चव्हाण आणि श्रीजया चव्हाण यांना अडवले. पण धामदरीतून त्यांनी काढता पाय घेतला. यापूर्वी देखील अमिता चव्हाण, श्रीजया चव्हाण यांना मराठा आंदोलकांनी अडवले होते.

advertisement

वाचा - 'सगळे चोर फडणवीसांकडेच', जरांगे संतापले; भुजबळ-आंबेडकरही निशाण्यावर

लोकसभा निवडणुकीतही फटका

लोकसभा निवडणुकीतही मराठा आरक्षणाचा मुद्दा अशोक चव्हाण यांच्या स्थानिक मतदारसंघ असलेल्या नांदेडमध्ये गाजला होता. या निवडणुकीत काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांनी बाजी मारली होती. 2014 मध्ये प्रतापराव चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता. मात्र, या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण सोबत होते, तरिही प्रतापराव चिखलीकर यांना पराभवाला सामोरे जावे लागेल.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
Ashok Chavan : अशोक चव्हाणांच्या पत्नी आणि कन्येला मराठा आंदोलकांनी अडवले; नेमकं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल