अशोक चव्हाण यांची लेक श्रीजया चव्हाण भाजपकडून भोकर विधानसभा मतदारसंघातून नशीब आजमवत आहेत. रविवारी भोकरमध्ये महायुती विजय संकल्प रॅली संपन्न झाली. या सभेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. या सभेला अशोक चव्हाण यांनी जनतेला संबोधित केले.
काँग्रेसकडून मला संपविण्याचे आदेश पण मी....
काँग्रेसने आता नांदेड टार्गेट ठेवलेले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री नांदेडला येणार आहेत. त्यांचा मुक्काम भोकरला असणार आहे. त्यांना दिल्लीतून आदेश देण्यात आले की काँग्रेस पक्ष सोडणाऱ्या अशोक चव्हाण यांना संपवा पण त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी मी संपणार नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले.
advertisement
माझे नाव न घेता नांदेडमध्ये मते मागून दाखवा
विरोधकांचा अजेंडा फक्त अशोक चव्हाण आहे. माझे महाविकास आघाडीला चॅलेंज आहे की नांदेडमध्ये माझे नाव न घेता मते मागून दाखवा. विरोधकांना माझ्या नावाशिवाय किंबहुना माझ्यावर टीका केल्याशिवाय नांदेडमध्ये प्रचार करू शकत नाहीत, असे अशोक चव्हाण म्हणाले.
म्हणून मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, अशोकरावांचा पहिल्यांदाच गौप्यस्फोट
मी काँग्रेसला रामराम ठोकून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला तो केवळ काँग्रेसला कंटाळून.. मला एका कोपऱ्यात टाकण्याचे काम पक्षातील काही जणांनी केले होते, त्यामुळे मी पक्ष बदलला, असा गौप्यस्फोट पहिल्यांदाच अशोक चव्हाण यांनी केला.