21 जानेवारीलाच काँग्रेस सोडण्याचे संकेत
काँगेस नेते अशोक चव्हाण हे पक्ष सोडून भाजपात जाणार असल्याची चर्चा गेल्या दीड वर्षापासुन सुरू होती. मात्र, याबाबत अशोक चव्हाण नेहमी नकार देत होते. 21 जानेवारी रोजी मात्र त्यांनी तसे अप्रत्यक्ष संकेत दिले होते. श्री राम मंदिरांच्या प्रतिष्ठापनेचे नांदेड शहरात अशोक चव्हाण यांचे अनेक बॅनर लागले होते. त्या बॅनरवर श्रीराम यांची प्रतिमा आणि फक्त अशोक शंकरराव चव्हाण इतकाच उल्लेख करण्यात आला होता. त्यांच्या नावाने लागलेल्या बॅनरवर काँगेस पक्षाचे नाव, पक्ष नेत्याचे फोटो किंवा पक्षाच चिन्ह देखील नव्हतं. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या मनात आहे तरी काय? असा प्रश्न उपस्थित झाला होता. तेव्हा नांदेडमध्ये राजकीय चर्चांना उधाण आले होते. अशोक चव्हाण यांच्या नावाने लागलेल्या बॅनरवर रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीताराम, ईश्वर अल्लाह तेरे नाम सबको संमती दे भगवान असा उल्लेख होता.
advertisement
वाचा - अशोक चव्हाण काँग्रेसमधून का बाहेर पडले? तुम्हीही राजीनामा देणार? प्रणिती शिंदेंनी सगळंच सांगितलं
नेमकं काय म्हणाले अशोक चव्हाण?
मी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मी पक्षाच्या प्राथमीक सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आहे. अन्य पर्याय पाहिले पाहिजे म्हणून मी राजीनामा दिला असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, मी काँग्रेसमध्ये असताना प्रामाणिकपणे काम केलं. मला कोणबद्दलही काहीही तक्रार नाही. मी कोणावरही नाराज नाही. पुढील राजकीय भूमिका येत्या दोन दिवसांत ठरवणार आहे. दरम्यान भाजपमध्ये प्रवेश करणार का? यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलं की, भाजपची कार्यप्रणाली मला माहिती नाही. भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. अन्य पर्याय पाहिले पाहिजे म्हणून मी राजीनामा दिला असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे.