नेमकं काय घडलं?
भाजपाचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांचे नांदेडमध्ये ठीक - ठिकाणी स्वागत केले जात आहे . अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानासमोर आयोजित एका कार्यक्रमात अशोक चव्हाण भाषणासाठी उभे राहिले, तेव्हा कार्यकर्त्यांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या. त्यावेळी अशोक चव्हाण यांनी भारत माता की जय म्हणत या घोषणांना उत्तर दिले, हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
advertisement
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली. त्यानंतर आता अशोक चव्हाण यांचं कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येत आहे. याच स्वागतादरम्यान कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. मात्र अशोक चव्हाण यांनी भारत माता की जय म्हणत या घोषणांना प्रत्युत्तर दिलं.