TRENDING:

भास्करराव खतगावकर पाटील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, अशोक चव्हाण यांना मोठा धक्का

Last Updated:

Bhaskarrao Khatgaonkar Patil : भाजपकडून सतत झालेल्या उपेक्षेमुळे कार्यकर्त्यांनी वाढलेली नाराजी व्यक्त करत भास्करराव पाटील यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये जाऊन पक्षाला उभारी द्यावी, अशी अपेक्षा मेळाव्याच्या माध्यमातून मांडण्यात आली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नांदेड : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांचे दाजी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच पार पडलेल्या नांदेड लोकसभेत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सूर्यकांता पाटील आणि भास्करराव खतगावकर यांचे पक्षबदल पाहता भाजपसमोरील अडचणी थांबण्याचे नाव घेत नाही.
अशोक चव्हाण आणि भास्करराव पाटील खतगावकर
अशोक चव्हाण आणि भास्करराव पाटील खतगावकर
advertisement

भास्करराव पाटील खतगावकर हे माजी मुख्यमंत्री, राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांचे सख्ख्ये दाजी आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्का देऊन अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्यासोबकत भास्करराव पाटील खतगावकर, त्यांच्या सुनबाई डॉ. मीनल खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह काँग्रेसच्या अनेकांनी भाजपचे कमळ हाती घेऊन मार्गक्रमण करण्याचा निर्णय घेतला होता. पण नांदेडमधील लोकसभेला झालेली हार आणि जनमताचा कौल लक्षात आल्यावर अनेकजण भाजपची साथ सोडत आहेत.

advertisement

'अबकी बार, मुख्यमंत्री अजित दादा पवार', दहीसरमध्ये राष्ट्रवादीकडून बॅनर

शंकरनगरच्या मेळाव्यात काँग्रेस प्रवेशावर शिक्कामोर्तब

भाजपकडून सतत झालेल्या उपेक्षेमुळे कार्यकर्त्यांनी वाढलेली नाराजी व्यक्त करत भास्करराव पाटील यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये जाऊन पक्षाला उभारी द्यावी, अशी अपेक्षा मेळाव्याच्या माध्यमातून मांडण्यात आली. प्रवेशाबाबत काँग्रेस नेत्यांचा आलेला प्रस्ताव शंकरनगरच्या मेळाव्यात मान्य करून काँग्रेस प्रवेशावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

advertisement

नांदेडमध्ये विधानसभेला अच्छे दिन

माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे येत्या 15 सप्टेंबर रोजी मुंबईत काँग्रेसमध्ये घरवापसी करतील. त्यांच्यासोबत त्यांच्या सुनबाई मीनल पाटील खतगावकर आणि दोन माजी आमदारही काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. त्यांच्या काँग्रेस प्रवेशाने विधानसभेला नांदेडमध्ये काँग्रेसला चांगला फायदा होईल, असे बोलले जात आहे.

भाजपला जबर धक्का

दुसीरकडे याआधी माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, माजी राज्यमंत्री डॉ माधवराव पाटील किन्हाळकर यांनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील एक गट फुटल्यामुळे भाजपला नांदेडमध्ये जबर धक्का बसला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
भास्करराव खतगावकर पाटील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, अशोक चव्हाण यांना मोठा धक्का
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल