डॉ मिलन खतगावकर ह्या नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदार संघातून इच्छुक आहेत. या मतदार संघात भाजपाचे विद्यमान आमदार राजेश पवार देखील उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार आहेत. मिनल खतगावकर यांनी एका कार्यक्रमात स्वतःची उमेदवारीच एक प्रकारे घोषित केली. दोन वेळा आम्हाला माघार घ्यावी लागली. 2019 आणि 2024च्या लोकसभेत पक्ष आदेश आम्ही मान्य केला. परंतु आता जर पक्षाकडून संधी मिळाली नाही तर अपक्ष लढण्याची कार्यकर्त्यांची भूमिका आहे. ती भुमिका मला मान्य आहे असं डॉ मिलन खतगावकर म्हणाल्या.
advertisement
Ajit Pawar : माझी लाडकी बहीण योजना किती दिवस चालणार? अजित पवारांनी एकदाचं सांगूनच टाकलं
2019 साली माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सोबत त्यांनी काँगेस सोडून भाजपात प्रवेश केला. नंतर 2022 साली पुन्हा काँगेस आणि आता लोकसभेपूर्वी अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांनी देखील पुन्हा भाजपात प्रवेश केला. लोकसभेसाठी त्यांनी भाजपाकडून उमेदवारी देखील मागितली होती. त्यासाठी मीनल खतगावकर यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आता पुन्हा नायगाव मधून त्या उमेदवारी मागत आहेत. मात्र याचं आपल्याला आश्चर्य नाही. त्यांचा डीएनए काँगेसचा आहे. 2019 ला भाजपाची लाट पाहून त्या भाजपात नंतर पुन्हा काँगेस आणि आता पुन्हा त्या भाजपात आल्या. आता नायगाव मधून भाजपाची उमेदवारी मिळणार नाही हे समजल्याने त्या अपक्ष लढण्याची भाषा करत आहेत. त्यांना शुभेच्छा अशी प्रतिक्रिया नायगावचे भाजपाचे आमदार राजेश पवार यांनी दिली.
दरम्यान लोकशाहीत कोणालाही उमेदवारी मागण्याचे अधिकार आहेत. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याची प्रतिक्रीया काँगेसकडून देण्यात आली. मीनल खतगावकर काँगेस मध्ये आल्या तर स्वागत आहे. पक्षनेत्यांची परवानगी , पक्ष नेत्यांना विचारून पक्षात घेऊ असं काँगेस नेते बी. आर. कदम म्हणाले. विशेष म्हणजे सध्या जिल्हा भाजपाची सर्व सूत्रं अशोक चव्हाण यांच्या हाती आहेत आणि त्यांच्याच भाचे सुनेने बंडाचा इशारा दिलाय. अशोक चव्हाण यांच्या परिवारातून बंडाची भाषा केली जात असल्याने हा चव्हाण यांना धक्का मानला जात आहे.