माजी राज्यमंत्री रजनी सातव यांच्यावर नांदेडमधील रुग्णालयात उफचार सुरू होते. आज सकाळीच त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र सायंकाळी उपचारावेळी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी १९ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी इथं त्यांच्या निवासस्थानी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील अशी माहिती समजते.
रजनी सातव या एकदा विधानसभेच्या तर एकदा विधान परिषदेच्या सदस्य होत्या. त्यांनी राज्याचे आरोग्य राज्यमंत्रीपद भूषवलं होतं. काँग्रेस प्रदेश संघटनेत त्यांनी अनेक वर्षे काम केलं होतं. दिवंगत राजीव सातव यांनाही राजकारणात सक्रीय करण्यासाठी मार्गदर्शन केलं होतं. राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यासुद्धा काँग्रेसमध्ये सक्रीय असून त्या आमदार आहेत. गेल्या ४३ वर्षांपासून काँग्रेसमध्ये सक्रीय असलेल्या सातव यांना गांधी घराण्याचे निकटवर्तीय म्हणूनही ओळखलं जातं.
advertisement