दरम्यान राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षाच्या वाट्याला कोणत्या आणि किती जागा येणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेस राज्यात 22 जागांवर निवडणूक लढवणार अशी चर्चा सध्या सुरू आहे. यावर आता अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुठलाही आकडा निश्चित केलेला नाहीये. आमच्या कडील माहिती आम्ही पक्षश्रेष्ठींना दिली आहे. तिन्ही पक्ष एकत्र बसून मग आकडा निश्चित केला जाईल, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
advertisement
दरम्यान दुसरीकडे त्यांनी प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीसोबत येणार का? यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडी सोबत यावे अशी आपली इच्छा आहे. मात्र कोणासोबत आघाडी करायची याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. मी माझी फक्त भूमिका मांडली. वंचित बहुजन आघाडी आपल्यासोबत आल्यास राज्यातील घडी राजकीय दृष्या चांगली राहिल असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.