लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला जोरदार धक्का बसला होता, तर दुसरीकडे महाविकास आघाडीने मात्र राज्यात जोरदार मुसंडी मारली . महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला. त्यामध्ये माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या नावाचा देखील समावेश आहे. वसंत चव्हाण यांनी काँग्रेसच्या तिकिटावर नांदेडमधून निवडणूक लढवली, त्यांनी प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव केला.
विशेष म्हणजे अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नांदेड लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. नांदेडमध्ये भाजपचं पारडं जड दिसत होतं. मात्र वसंत चव्हाण यांनी प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव केला. हा नांदेडमध्ये अशोक चव्हाण आणि भाजपसाठी मोठा धक्का होता.
advertisement
वसंत चव्हाण हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते, मध्यरात्री त्यांची तब्येत बिघडली, आज पहाटे चार वाजता त्यांचं निधन झालं. उद्या मंगळवारी सकाळी 11 वाजता नायगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.