याबाबत मिळालेली माहिती अशी की, लोहा तालुक्यातील झरी परिसरात विद्यापीठाच्या बाजूला एक मोठी खदान आहे. या ठिकाणी साचलेल्या पाण्यात नंदेडसह परिसरातील अनेकजण पोहण्यासाठी येत असतात. मंगळवारी पहाटे देगलूर नाका परिसरातील पाच मित्र पोहण्यासाठी झरी परिसरात आले. त्यांनी या परिसरात फोटोसेशन करून पोहण्यासाठी खदानीत उतरले. पण, पाण्याचा अंदाज न आल्याने चौघांचा बुडून मृत्यू झाला आहे.
advertisement
घटनेची माहिती मिळताच बचाव कार्यासाठी नांदेड येथील अग्निशमन दलाच्या पथकासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांकडून सध्या मृतदेह पाण्याबाहेर काढण्याचे काम सुरू असून दोन मृतदेह आढळून आले आहेत. इतर दोघांचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, सोनखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने आणि इतर कर्मचारी उपस्थित आहेत.
एकमेकांना वाचवायला गेले अन् चौघेही बुडाले
खदानी परिसरात पाचही तरुणांनी फोटोसेशन केले. त्यानंतर पोहण्याचा मोह आवरता न आल्याने मोहम्मद फैजान वगळता चौघेजण पाण्यात उतरले. आफान पोहत पोहत पुढे गेला. पाण्याचा अंदाज न आल्याने त्याला माघारी परतणे कठीण झाले. त्यात दम लागल्याने तो बुडू लागल्याचे पाहून त्याला वाचविण्यासाठी इतरांनी त्याच्याकडे धाव घेतली. परंतु चौघांचाही बुडून मृत्यू झाला.