जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई होणार : हसन मुश्रीफ
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, की घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई होणार आहे. नांदेडमध्ये दररोज 1500 ते 1600 रुग्ण येतात. आजूबाजूच्या जिल्ह्यातील मोठ्या संख्येने रुग्ण नांदेडमध्ये येतात. मृतांमध्ये 12 बालरोगी आहेत, त्यापैकी 48 तासात दाखल झालेले 6 बाळं होती. 24 तासात दाखल झालेली 6 बाळं होती. साप चावल्याने दोघांचा मृत्यू, गंभीर आजारामुळे 7 जण दगावले, प्रसूतीमुळे 1 आणि हृदयविकाराच्या झटक्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. म्हणजे 24 तासात 24 मृत्यू झाले आहेत, हे खूप दुर्दैवी आहे. खासगी रुग्णालयात रुग्ण गंभीर झाले की त्यांना सरकारी रुग्णालयात आणले जाते. उद्या मंत्रिमंडळाची बैठक घेऊन मी स्वतः नांदेडला जाणार आहे. त्याआधी मी अधिकाऱ्यांना नांदेडला पाठवलं आहे, त्यांच्याकडून आढावा घेतला जाईल. घडलेल्या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती नेमली जाईल. पैशाच्या कारणावरून डिस्चार्ज देणाऱ्या खासगी रुग्णालयांवर चाप लावला जाणार असल्याचाही इशारा हसन मुश्रीफ यांनी दिला आहे.
advertisement
वाचा - उपोषणादरम्यान रोहित पाटील यांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिला इशारा
24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू
हाफकीनने औषधी खरेदी बंद केल्यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयात औधधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे, अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषधे पुरवठा होत नसल्याने जीव गमवावा लागत आहे. असाच धक्कादायक प्रकार नांदेड मधल्या शासकीय रुग्णालयात पुढे आला आहे. गेल्या 24 तासात 24 रुग्णांचा रुग्णालयात मृत्यू झाला असून त्यात गंभीर बाब म्हणजे बारा नवजात बालकांचाही मृतात समावेश आहे. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली आहेत. या प्रकरणी शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी मृतांमध्ये बाहेरच्या रुग्णाचा जास्तीचा समावेश होता असा दावा केला आहे. शिवाय रुग्ण गंभीर होते असे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, महिन्यापूर्वी ठाण्यात अशी घटना घडून गेल्यानंतरही राज्याच्या आरोग्य खात्याला जाग आली नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.