TRENDING:

ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत गुजरात पोलिसांची नांदेडमध्ये मोठी कारवाई, तरुणाला घेतलं ताब्यात, पाकिस्तान कनेक्शन समोर

Last Updated:

गुजरात पोलिसांनी नांदेडमधून एका तरुणाला तब्यात घेतलं आहे. या तरुणाचं पाकिस्तान कनेक्शन समोर आलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नांदेड, मुजीब शेख प्रतिनिधी : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच नांदेडमधून मोठी बातमी समोर आली आहे. गुजरात पोलिसांनी नांदेडमधील एका 18 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं आहे. या तरुणाचं पाकिस्तान कनेक्शन असल्याचा संशय आहे. या घटनेनं खळबळ उडाली असून प्रकरणाबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्यातील नरसी येथील एका 18 वर्षीय तरुणाला गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या तरुणाचं पाकिस्तान कनेक्शन असल्याचा संशय आहे. हा तरुण पाकिस्तान येथील जैश बाबा राजपूत या व्हॉट्सअप ग्रुपचा सदस्य होता. पाकिस्तान येथील वकास आणि सरफराज हे दोघे या ग्रुपचे ॲडमिन आहेत. या ग्रुपमध्ये सुरत येथील सोहेल आणि बिहार राज्यातील शहनाज हेआणखी दोन तरुण देखील सहभागी होते.

advertisement

भारतातील या तिघांनी अनेक हिंदुत्वादी संघटनांच्या लोकांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात नांदेडच्या या तरुणाला चौकशीसाठी गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत गुजरात पोलिसांची नांदेडमध्ये मोठी कारवाई, तरुणाला घेतलं ताब्यात, पाकिस्तान कनेक्शन समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल