नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यातील लोहगावमध्ये गावात शिरलेल्या वानरांच्या टोळीकडून धुमाकूळ सुरू आहे. गेल्या महिनाभरापासून या वानरांनी या गावाच्या परिसरातच आपला मुक्काम ठोकला आहे. यातील एका पिसाळलेल्या वानराने गावात अनेकांना चावा घेतला आहे. अंगणात खेळणाऱ्या एका पाच वर्षांच्या चिमुकलीलाही या वानराने चावा घेतला. या घटनेत ही चिमुकली जखमी झाली आहे. वानरांच्या त्रासाला ग्रामस्थ कंटाळले असून या वानरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. संतप्त ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत कार्यालयाला ताळं ठोकण्यात आलं आहे.
advertisement
दरम्यान आक्रमक ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला ताळ ठोकल्यानंतर अखेर वनविभागाचं एक पथक गावात दाखल झालं आहे. पिंजरा लाऊन या पिसाळलेल्या वानराला पकडण्याचा प्रयत्न वनविभागाकडून केला जाणार आहे.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
May 10, 2024 3:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
Nanded News : नांदेडमध्ये वानरांच्या टोळीची दहशत, अनेकांना घेतला चावा, चिमुकली जखमी