घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नांदेड शहराजवळ असलेल्या नेरली या गावात दोनशेहून अधिक जणांना विषबाधा झाली आहे. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या टाकीतील पाणी पिल्यामुळे हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रात्री गावातील अनेकांना उलट्या आणि डोकेदुखी त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर मात्र हा प्रकार वाढतच गेला.
advertisement
अनेकांना हा त्रास जाणू लागला. मोठ्या संख्येने रुग्ण वाढत असल्याने मिळेल त्या वाहनाने रुग्णांना खासगी आणि शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोनशेहून अधिक जणांना विषबाधा झाली आहे. घटनेचं गांभीर्य ओळखून आरोग्य यंत्रणा गावात तळ ठोकून आहे.
सध्या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे. सर्व रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य अधिकारी , आरोग्य पथक गावातील प्रत्येकाची तपासणी करत आहे. नेमका हा प्रकार कशामुळे घडला याचा देखील शोध सुरू आहे, मात्र पाण्यामुळेच ही विषबाधा झाली असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.