नेमकं काय म्हणाले पटोले?
विशाल पाटील यांनी सांगलीमध्ये बंडखोरी केली आहे, महाविकास आघाडीमध्ये ही जागा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला गेली असतानाही तिथे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे. याबाबत नाना पटोले यांना विचारले असता सांगली लोकसभेत झालेल्या बंडखोरीबाबात येत्या 25 तारखेला तिथल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.
advertisement
दरम्यान सांगली लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट अशा दोन्हीही पक्षांकडून दावा करण्यात आला होता. उद्धव ठाकरे यांनी त्याआधीच पक्षाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. यावरून महाविकास आघाडीत नाराजी नाट्य देखील पाहायला मिळालं. या जागेवरून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी विशाल पाटील हे इच्छूक होते. मात्र ऐनवेळी पक्षाकडून तिकीट न मिळाल्यानं त्यांनी बंडखोरी केली. आता त्यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.