TRENDING:

निवडणुकीसाठी तयारी पण मुद्दाम कानाडोळा, नांदेडमध्ये काँग्रेसची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर

Last Updated:

काँगेसची उमेदवारी देण्याच्या अटीवरच खतगावकर यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र नायगाव मतदारसंघातूनच काँग्रेस अंतर्गत मीनल खतगावकर यांना विरोध असल्याचे स्पष्ट झाले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदार संघातील काँगेस पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. नायगाव विधानसभा मतदारसंघात आज काँगेस पक्षाकडून दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या शोकसभेच्या बॅनरवर माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचे फोटो लावण्यात आला नाही. विशेष म्हणजे नायगाव मतदारसंघात खतगावकर यांच्या सून मीनल खतगावकर यांनी काँगेस पक्षाच्या उमेदवार म्हणून प्रचार सुरु केला आहे.
भास्करराव पाटील
भास्करराव पाटील
advertisement

काँगेसची उमेदवारी देण्याच्या अटीवरच खतगावकर यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र नायगाव मतदारसंघातूनच काँग्रेस अंतर्गत मीनल खतगावकर यांना विरोध असल्याचे स्पष्ट झाले.

नायगाव मतदारसंघ हा दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे चव्हाण कुटुंबाला आपल्या बालेकिल्ल्यात स्पर्धक नको असल्याने खतगावकर यांना टाळले जात असल्याचे चित्र आहे. दरम्यान शोकसभेच्या बॅनरवर खतगावकर यांचे फोटो अनावधानाने लावले गेले नाही, असे उत्तर दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण यांनी दिले.

advertisement

या कार्यक्रमाचे रितसर निमंत्रण भास्कराव पाटील खतगावकर यांना देण्यात आले होते. मात्र ते बाहेरगावी असल्याने कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही, असे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले दुसरीकडे भास्करराव पाटील खतगावकर आणि मीनल पाटील खतगावकर यांची या कार्यक्रमाला अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.

खतगावकर यांच्या काँग्रेस प्रवेशाने भाजपला मोठा धक्का

भारतीय जनता पक्षाला काँग्रेसने मोठा धक्का देत नांदेड जिल्ह्यात मोठे खिंडार पाडले. नांदेडचे माजी खासदार, भाजपा नेते भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, युवा नेत्या डॉ. मीनल पाटील खतगावकर यांनी 20 सप्टेंबरला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते आणि माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

advertisement

भास्कराव पाटील खतगावकर यांच्या प्रवेशाने नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेला आणखी बळ मिळेल व विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातूनही काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील,असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षप्रवेशावेळी व्यक्त केला.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
निवडणुकीसाठी तयारी पण मुद्दाम कानाडोळा, नांदेडमध्ये काँग्रेसची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल