सक्षमवर गुन्हा दाखल कर, माझ्यावर दबाव
घटनेच्या दिवशी माझा लहान भाऊ मला बळजबरीने पोलीस चौकीत घेऊन जात होता, सक्षमवर गुन्हा दाखल कर, असा माझ्यावर दबाव तो टाकत होता. मात्र, मी तक्रार दिली नाही. मी पोलिसांसमोर सांगितलं की मला गुन्हा दाखल करायचा नाही. त्यावर पोलिसांनी माझ्या भावाला भडकवलं. रोज मारामाऱ्या करून इथे येतोस. तुझ्या बहिणीचं लफडं ज्याच्या सोबत आहे. त्याला मारून ये, असं पोलीस कर्चमाऱ्याने माझ्या भावाला भडकवलं होतं.
advertisement
भाऊ हिमेशने मला धमकी दिली
मी ज्यासाठी जगत होते तोच राहिला नाही. मला भीती नाही पण सक्षमच्या परिवाराला सुरक्षा द्या, त्यांच्या जीवाला धोका आहे. माझा भाऊ हिमेश याने मला धमकी दिली की, मी अल्पवयीन आहे, मी सुटून बाहेर आलो की सक्षमच्या परिवाराला सोडणार नाही, असं आंचलने आरोप केला आहे. मला माझ्या प्रेमाची शपथ शेवटपर्यंत ठाम राहील, त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, फाशी झाली पाहिजे, असंही ती म्हणते.
मला सांगितलं देवदर्शनाला जायचंय पण...
ज्यादिवशी सक्षमचा खून झाला, त्यादिवशी मला सांगितलं की देवदर्शनाला जायचंय. मला घेऊन परभणी जिल्ह्यातील मानवत येथे आईच्या माहेरी नेलं. तिथं आई आणि काका काकू होते. माझे वडील आणि दोन्ही भाऊ आले नव्हते. आम्ही मानवताला थांबलो, तेव्हा पोलीस, माझे वडील आणि दोन्ही भाऊ आले. त्यांनी मला सांगितलं सक्षमला दोन तीन टाके लागले. पण दुसऱ्या दिवशी चौकीत मी सक्षमच्या मृतदेहाचा फोटो पाहिला, असं आंचलने सांगितलं.
