मुलीवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट
नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे काल (सोमवारी) मृत अवस्थेत मिळालेल्या 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. मुदखेड पोलीस ठाणे हद्दीतील एका गावातील मुलीचे 14 जानेवारी रोजी अपहरण करण्यात आले होते. काल या चिमुकलीचा मृतदेह गावापासून 12 किलोमिटर दूर मुदखेड उमरी रोडवर आढळला होता. या चिमुकलीवर अत्याचार करून अज्ञात नराधमाने तिची हत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार गुन्ह्याची कलमे वाढवण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. घटनेनंतर आरोपीच्या शोधासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांची वेगवेगळी पथकं परिश्रम घेत आहेत. संशयित आरोपीची चौकशी सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले.
advertisement
वाचा - शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट; सूत्रधार विठ्ठल शेलारसह वाघ्या मारणेला पोलीस कोठडी
अशोक चव्हाणांकडून पीडित कुटुंबाची भेट
मुदखेडमधील घटनेनंतर मंगळवारी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी गावात जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली. घटना अतिशय चीड निर्माण करणारी आहे. पोलिसांनी तात्काळ आरोपींचा शोध लावावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली होती. भाजप आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता देवरे यांनीही पीडित कुटुंबाची भेट त्यांचे सांत्वन केलं होतं.