TRENDING:

आमची नोंद कुठेही नाही! महाराष्ट्रातलं एक गाव जे ना नकाशावर, ना गावकऱ्यांच्या नावे सातबारा

Last Updated:

गावकऱ्याकडे मतदान कार्ड , रेशन कार्ड , आधार कार्ड आहे. त्यानुसार हे गावकरी महाराष्ट्रतील असले तरी गावाची महसुली नोंद नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुजीब शेख, नांदेड, 15 डिसेंबर : महाराष्ट्रात असे एक गाव आहे जे महाराष्ट्राच्या नकाशावरच नाही. नकाशावरच गावाचे अस्तित्व नसल्याने कोणत्याच सोयी सुविधा या गावापर्यंत पोहोचल्या नाही. सात किलोमीटर जंगलातून जीव मुठीत घेऊन या ग्रामस्थांना पायपीट करावी लागते. नांदेड जिल्ह्यातील किनवट या आदिवासी तालुक्यात असे एक गाव आहे जे अजूनही महाराष्ट्राच्या नकाशावर नाही. तेलंगणा सीमेवर लागून महाराष्ट्राच्या हद्दीतील हे गाव आहे वाघदरी. अडीचशे लोकसंख्येच हे गाव आहे.
News18
News18
advertisement

प्रांतवार रचनेनंतर हे गाव आंध्र प्रदेशमधून महाराष्ट्रात आले. पण तेलंगणा सीमेवर असलेले हे गाव मात्र अजूनही महाराष्ट्राच्या नकाशावर आले नाही. महसुली नोंदच नसल्याने या गावात कुठल्याच सुविधा पोहोचल्या नाही. जवळपास साडेचार हजार हेक्टर शेतजमीन असली तरी महसुली नोंद नसल्याने कोणाकडेच जमिनीचा सातबारा नाही. सातबारा नसल्याने पीकविमा, अनुदान अश्या कुठल्याही योजनेचा फायदा या गावाला मिळत नाही. जात प्रमाणपत्र नाही, वनहक्क जमीन पट्टे नाहीत.

advertisement

गावकऱ्याकडे मतदान कार्ड , रेशन कार्ड , आधार कार्ड आहे. त्यानुसार हे गावकरी महाराष्ट्रतील असले तरी गावाची महसुली नोंद नसल्याने त्याचं गाव मात्र नकाशावर नाही. गावाची महसुली नोंद घेण्याची मागणी अनेक वर्षापासून गावकरी करत आहेत. पण प्रशासनाकडून दखल घेतली गेली नाही. दरम्यान किनवट येथील सहायक जिल्हाधिकारी एस कार्तीकेयन यांनी आता गावाची आकार बंदी आणि जमिनीची मोजणी सुरू केली. ही प्रकिया पूर्ण करुन महसुली नोंद घेण्याच्या प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे. मात्र या प्रक्रियेला बराच काळ लागण्याची शक्यता आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
आमची नोंद कुठेही नाही! महाराष्ट्रातलं एक गाव जे ना नकाशावर, ना गावकऱ्यांच्या नावे सातबारा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल