ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नांदेडचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी काँगेस सोडून भाजपात प्रवेश केला. नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदार संघातून अशोक चव्हाण आमदार होते. आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाने त्याना राज्यसभा दिली. अर्थात बेरजेचे गणित खेळत भाजपाने अशोक चव्हाण यांना पक्षात घेतले. नांदेडसह मराठवड्यात अशोक चव्हाण यांच्यामुळे पक्षाला फायदा होऊ शकतो असं त्यामागचं गणित होतं.
advertisement
दरम्यान यंदाच्या नांदेड लोकसभा निवडणुकीत मराठा आणि मुस्लिम मतांची टक्केवारी वाढल्याचं पाहायला मिळालं . मुस्लिम बाहुल आणि मराठा बहुल गावात मतदानासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. तसेच काही प्रमाणात मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनाचा भाजपला फटका बसेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे, त्यामुळे या मतदारसंघातील निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.