नेमकं प्रकार काय घडला?
मुखेड तालुक्यातील एका गावात राहणारे किसन इंगळे यांची म्हैस मागील महिनाभरापासून आजारी होती. तिला काय झालं, याबाबत कुणाला काहीच समजत नव्हतं. दरम्यान इंगळे यांनी या म्हशीचं दूध नेहमीप्रमाणे गावकऱ्यांना विकलं होतं. यातून गावातील लहान थोरापासून अनेकांनी या म्हशीचं दूध किंवा या म्हशीच्या दूधापासून बनवलेले विविध पदार्थ खाल्ले होते. पण अलीकडेच या म्हशीचा मृत्यू झाला.
advertisement
या म्हशीचा मृत्यू झाल्यानंतर संबंधित म्हशीला कुत्र्याने चावा घेतल्याने तिचा मृत्यू झाला असावा, अशी चर्चा सुरू झाली. जेव्हा या म्हशीच्या मालकाने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना ही म्हैस दाखवली, तेव्हा तिच्यात रेबीज सदृश्य लक्षणं दिसून आली. यामुळे रेबीज झालेल्या म्हशीचं दूध प्यायल्याने गावकऱ्यांमध्ये घबराट पसरली. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य यंत्रणेने गावातील तब्बल १८० जणांना रेबीजचं इंजेक्शन दिलं आहे.