कशी घडली घटना?
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मारेगाव (खा.) येथील एक कुटुंब मारेगाव शिवारातील पैनगंगा नदीवर 27 मे रोजी सहलीसाठी गेले होते. पार्टी झाल्यानंतर नदीत ममता शेख जावेद (वय 21), पायल देविदास कांबळे (वय 16) व तिची बहीण स्वाती देविदास कांबळे (वय 13) व अन्य पोहण्यासाठी गेले होते. नदीत एकमेकांवर पाणी टाकत पोहण्याचा आनंद लुटत असतानाच यातील एक जण बुडू लागली. तिला वाचवण्यासाठी गेलेल्या अन्य दोघीही बुडाल्या. यात तिघींचा बुडून मृत्यू झाला. पोहता येणारी एक महिला सुखरूप निघाली असून एकजण घटनास्थळावरून पळून गेल्याची चर्चा सुरू आहे. या घटनेमध्ये दोन मुलींना गमावल्यामुळे कांबळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
advertisement
वाचा - वादळामुळे घर कोसळून एकाच कुटुंबातील 4 ठार! 10 वर्षांचा बालक बचावला पण..
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनिल बिर्ला, सपोनि येवले, पोलीस उपनिरीक्षक गणेश घोटके, दत्तात्रय मामीडवार, पोहेकॉ संग्राम मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. एकाच कुटुंबातील दोन बहिणी व अन्य एक विवाहित महिला अशा तिघींचा पैनगंगा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.