आमच्या भूमिका वेगळ्या.. : अशोक चव्हाण
अशोक चव्हाण यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, की आमच्यात वाद नव्हता. आमच्या पक्षाच्या भुमिका वेगवेगळ्या होत्या. आमच्यात आता समन्वय आहे. आम्ही एकाच पक्षात आहोत. आमच्यात आता कुठलाही वाद विवाद राहिला नाही, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली. पूर्वी आमची भुमिका पक्षाची होती, असं अशोक चव्हाण म्हणाले. तर दुसरीकडे अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला तेव्हा मी स्वागताला होतो. ते पक्षात आल्यानंतर आता तो विषय राहिला नाही. आम्ही समन्वयाने काम करू, असं प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले. लोकसभेला पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडून आणू असं चिखलीकर म्हणाले.
advertisement
वाचा - मनोज जरांगे बॅकफूटवर? बारस्करांच्या आरोपांवर दिली अशी प्रतिक्रिया
प्रत्येक निवडणूक माझ्यासाठी आव्हानात्मक : चव्हाण
नांदेडला आल्यानंतर आज खासदार अशोक चव्हाण यांनी भाजपा खासदार, आमदारांची बैठक घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आपण या सर्वांना चहापाण्यासाठी बोलवलं होतं. पक्षात कोणतेही वाद राहू नये, समन्वय रहावं याबाबत चर्चा झाली, शिवाय आगामी लोकसभा निवडणूक ताकदीने लढण्याबाबत चर्चा झाल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. लोकसभा निवडणुकीत काँगेसच आव्हान असेल का? असं विचारलं असता मी कोणतीही निवडणूक मी आव्हान म्हणूनच पाहतो, कुठहीली निवडणूक मी सोपी समजत नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत जोरदार तयारी करून भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू असं अशोक चव्हाण म्हणाले. दरम्यान नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसच्या तीन आमदाराबाबत बोलण्याच अशोक चव्हाण यांनी टाळलं. प्रत्येकाच्या मतदार संघातील परिस्तिथीनुसार लोकप्रतिनिधी विचार करतात, निर्णय घेणे सोप नाही. ते त्यांच्या मतानुसार निर्णय घेतील, असं अशोक चव्हाण म्हणाले.