याबाबत मिळालेली माहिती अशी की, नांदेड जिल्हयातील कंधार तालुक्यातील कुरुळा येथील अंजली वाघमारे या 21 वर्षीय गरोदर महीलेला रुग्णालयात दाखल केले होते. 30 सप्टेंबर प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुसऱ्या दिसशी तिची नॉर्मल प्रसूती झाली. तिला मुलगी झाली. आई आणि बाळाची प्रकृति चिंताजनक असल्याचे सांगून डॉक्टरानी रक्त पिशव्या आणि अन्य औषधी मागवल्या. त्यासाठी 45 हजार खर्च आला असा उल्लेख मयत अंजलीचे वडील कामाजी टोंपे यांनी तक्रारीत केला.
advertisement
औषधी आणून देउनही उपचार दिले जात नव्हते. तिथे डॉक्टर आणि नर्स नव्हते. याबाबत अधिष्ठाता डॉ श्याम वाकोडे यांच्याकडे तक्रार केली. उपचार करण्याची विनंती केली. पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शिवीगाळ करुन हाकलून दिले अशी तक्रार करण्यात आली. त्याच दिवशी बाळाचा मृत्यु झाला. अंजलीवर देखील योग्य उपचार करण्यात आले नाही. परिणामी तिचा 4 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. या दोन्ही मृत्यूस अधिष्ठाता डॉ श्याम वाकोडे आणि त्यांचे सहकारी कारणीभूत असल्याची तक्रार करण्यात आल्याने ग्रामीण पोलीसानी कलम 304 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला.