घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ही घटना नांदेडमध्ये घडली आहे. आरोपी शेरसिंघ गिल हा खून प्रकरणात पॅरोलवर बाहेर आला होता. शेजारी असलेल्या हरदिपसिंघ पाठी यांच्या भावासोबत आरोपीचे काही कारणाने भांडण झालं. भांडण सोडवण्यासाठी हरदिपसिंघ पाठी गेले असता त्यांच्या मागे आरोपी हा तलवार घेऊन लागला. पळत असताना हरदिपसिंघ खाली पडले आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
advertisement
दरम्यान आरोपीला पकडण्यासाठी पोलीस आले असता आरोपीने गॅस सिलेंडर पेटवण्याची धमकी दिली. तसेच आरोपी पोलिसांवर तलवार उगारत होता. त्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला. पोलिसांनी त्याच्या पायाच्या दिशेनं चार ते पाच गोळ्या झाडल्या. यामध्ये दोन गोळ्या आरोपीच्या पायाला लागल्यामुळे तो जखमी झाला आणि पोलिसांनी त्याला पकडलं.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
December 17, 2023 5:37 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
नांदेडमध्ये कैद्याचं शेजाऱ्याशी भांडण; पोलिसांचा गोळीबार, शेजाऱ्याच्या भावाचा हृदयविकाराने मृत्यू