शरद पवार यांचे वक्तव्य आणि उद्धव ठाकरे यांची भुमिका चिथावणीखोर : आंबेडकर
मराठा ओबीसीतील वादाचा फायदा कोण घेत आहेत? असा प्रश्न ऍड आंबेडकर यांना विचारलं असता, सर्वच राजकीय पक्ष फायदा घेत असल्याचं ते म्हणाले. शरद पवार यांच वक्तव्य आलं की महाराष्ट्राचा मणिपूर करू नका, ते वक्तव्य आग लावणारं आहे. तसेच उद्धव ठाकरे यांची जी भुमिका आहे की तुम्ही नरेंद्र मोदीकडे जा, जागा वाढवून घ्या आणि मग आपण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ, ही भुमिका चिथावणीखोर असल्याचं ऍड प्रकाश आंबेडकर म्हणाले. पण राज्यातील जनतेचं कौतुक करतो की ते राजकीय मतभेद सामजिक करू इच्छित नाहीत, असं ऍड प्रकाश आंबेडकर म्हणाले.
advertisement
गरीब मराठ्यांनी आम्हाला सत्तेवर बसवावं आम्ही समाजाला आरक्षण देऊ : आंबेडकर
आम्ही तर म्हणतो की गरीब मराठ्यांनी आम्हाला सत्तेत बसवावं, ओबीसीसोबत वंचितला सत्ता द्यावी. आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मार्ग काढतो, असं ऍड प्रकाश आंबेडकर म्हणाले. मराठा समाजाला ओबीसीतून नाही तर स्वतत्र्य आरक्षण देण्याचं आश्वासन आंबेडकरांनी दिलं.
वाचा - देशाच्या राजकारणात मोठे फेरबदल होणार? शरद पवारांचे संकेत; जयंत पाटील म्हणाले..
संविधान बचाव यात्रेमुळे दंगा थांबला : आंबेडकर
संविधान बचाव यात्रा काढण्यामागे आमची काहीही मागणी नाही. जरांगे पाटील यांनी जी मागणी केली मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्याव, त्यावरून गावात दोन तट झाले. राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात टोकाचे मतभेद झालेत, मराठा समाज म्हणातो आम्ही ओबीसीला मतदान करणार नाही आणि ओबीसी समाज म्हणतो आम्ही मराठा समाजाला मतदान करणार नाही. या वादाचा काहीजण फायदा उचलत या राजकीय भांडणाला सामजिक वळण देण्याच्या परिस्थितीत असल्याचा आरोप ऍड प्रकाश आंबेडकर यांनी केला. आम्ही या यात्रेच्या माध्यमातून दोन्ही समाजाला समजावून सांगत आहोत, आरक्षण कोण देऊ शकतो, कशा पद्धतीने देऊ शकतो. आम्ही याबाबत जागृती करत आहोत. त्यामुळे दंगा माजवण्याचा जो प्रकार होता तो शमला असं ऍड प्रकाश आंबेडकर म्हणाले.