नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील कोष्टवाडी गावात जवळपास एक हजार लोकांना विषबाधा झाली आहे. संत बाळूमामा यांचा धार्मिक कार्यक्रमांमध्ये भगर खाल्ल्यामुळे विषबाधा झालेली आहे. बाधित लोकांना लोहा शासकीय आणि खासगी, नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्रीपासून मिळेल त्या वाहनाने रुग्णांना रुग्णालयात दाखल केले जात आहे . सध्या सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
advertisement
राज्यातून थंडी गायब! उकाडा वाढला, या भागांमध्ये पावसाचा अंदाज
परभणी तालुक्यातील माळसोन्नामध्ये भगर खाल्ल्यानं शंभरहून अधिक जणांना अन्नातून विषबाधा झाली आहे. एकादशी असल्याने भाविकांना भगरीचे वाटप प्रसाद म्हणून करण्यात आले. ही भगर खाल्ल्यानंतर काही वेळाने अनेकांना उलटी, जुलाब, चक्कर येणे असे प्रकार सुरू झाले. पाहता पाहता हा त्रास अनेकांना होऊ लागला. त्यामूळे ग्रामस्थांनी तसेच भाविकांनी उपचारासाठी परभणी गाठली. साधारण शंभरहून अधिक जणांना ही विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली आहे.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा, मटन स्वस्त झालंच पाहिजे म्हणत काढली सायकल रॅली, Video
परभणी तालुक्यातील सोन्ना या गावांमध्ये सप्ताहाचा कार्यक्रम होता. त्यात आज एकादशीनिमित्त, भाविकांसाठी भगरीचा प्रसाद तयार करण्याचा होता. या भगरीमुळे या या भाविकांना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. विषबाधा झालेल्या भाविकांना उपचारासाठी परभणीच्या शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परभणीच्या शासकीय रुग्णालयामध्ये या रुग्णांची मोठी गर्दी झाल्यामुळे सोयीसुविधांची कमतरता जाणवत आहे.