वडेट्टीवार म्हणाले, की इतके मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिल्लीला जाणे आवश्यक होत की इथे येणे महत्त्वाचे होते, याचे उत्तर त्यांनी द्यावे. एक पालकमंत्री एक उपमुख्यमंत्री रुसून बसले होते. इकडे लोकं मरत आहेत. तिकडे मात्र एका उपमुख्यमंत्र्याकडे बैठक होत आहे, अशी टीका वड्डेटीवार यांनी केली. या घटनेनंतर संबधित खात्याच्या मंत्र्याने राजीनामा द्यावा अशी मागणी देखील वडेट्टीवार यांनी केला आहे.
advertisement
नागपूरमध्येही सरकारी रुग्णालयात मृत्यूचे तांडव
महाराष्ट्रात नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरनंतर नागपूरच्या सरकारी रुग्णालयात 24 तासात 25 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालीय. दोन वेगवेगळ्या रुग्णालयात मिळून एका दिवसात 25 रुग्ण दगावल्याची माहिती समोर आलीय. याआधी छत्रपती संभाजीनगरमधील सरकारी रुग्णालयात मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 24 तासात किमान 18 मृत्यूची नोंद झाली. याआधी मराठवाड्यातील नांदेडमध्ये शंकरराव चव्हाण सरकारी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात 30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान 24 तासात 24 मृत्यू झाले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी सात तर तिसऱ्या दिवशी सहा जणांचा मृत्यू झाला.
वाचा - कुणाचं पालकमंत्रिपद गेलं, कुणाला मिळालं? कुणाचा राहिला वरचष्मा?
नागपूरमध्ये मेडिकल आणि मेयो या दोन्ही रुग्णालयात मिळून 25 रुग्णांचा मृत्यू झाला. या दोन्ही रुग्णालयात विदर्भासह मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा या राज्यांमधून रुग्ण दाखल होत असतात. दोन्ही रुग्णालयात 1800 बेड आहेत. मेडिकल रुग्णालयात 16 तर मेयोमध्ये 9 रुग्ण गेल्या 24 तासात दगावले. यात मेडिकलमधील एकूण रुग्णांपैकी 8 रुग्ण हे अत्यवस्थ असताना खासगी रुग्णालयातून दाखल झाले होते.