याबाबत मिळालेली माहिती अशी की, नांदेडमधील रुग्णालयात 22 वर्षीय अंजली वाघमारे या महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी तिची प्रसूती झाली. महिलेची नैसर्गिक प्रसूती होऊन तिने मुलीला जन्म दिला. पण शनिवारीच नवजात बाळाचा मृत्यू झाला. त्यांनतर महिलेची प्रकृती बिघडत गेली आणि आज महिलेचा मृत्यू झाला.
महिलेवर शनिवारपासून उपचार सुरू असताना डॉक्टरांनी उपाचाराबाबत काही माहिती दिली नाही. सर्व औषधे आणि रक्त तपासण्या बाहेरून कराव्या लागल्या. त्यासाठी 40 ते 45 हजारांचा खर्च करावा लागल्याची माहिती महिलेच्या पतीने दिली. आज महिलेचा मृत्यू झाला. बाळानंतर आईचाही मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी हंबरडा फोडला.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 04, 2023 4:30 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
Nanded : प्रसूतीसाठी आणले रुग्णालयात, बाळ दगावले अन् आईचाही मृत्यू; नातेवाईकांनी फोडला हंबरडा